...नाहीतर 'ईडी'वाले यायचे घरी!; राज ठाकरेंच्या निकटवर्तीयाने केलेली पोस्ट चर्चेत

Raj Thackeray MNS Vasant More Post: मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनाच्या कालावधीमध्ये पुण्यातून सर्वात चर्चेत असलेलं नाव ठरलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सध्या वसंत मोरे चर्चेत असण्यामागील कारण ठरत आहे त्यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट. वसंत मोरेंनी ईडी म्हणजेच एन्फोर्समेंट डायक्टरेटचा उल्लेख करत केलेली पोस्ट सध्या सर्वांचा लक्ष वेधून घेत आहे. ते नेमकं काय म्हणाले आहेत पाहूयात...

| Jun 12, 2023, 12:00 PM IST
1/8

MNS Pune Leader Vasant More Colour his Audi Car

मनसेचे पुण्यातील शिलेदार वसंत मोरेंना ईडीच्या कारवाईची भिती वाटत आहे असं सांगितलं तर तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. मात्र त्यांनीच एका पोस्टमध्ये असा उल्लेख केला आहे.

2/8

MNS Pune Leader Vasant More Colour his Audi Car

वसंत मोरेंनी नवीन आलिशान गाडी घेतल्याची चर्चा सध्या पुण्यामध्ये रंगली आहे. या चर्चेला कारण ठरलं आहे त्यांनीच केलेली एक पोस्ट.

3/8

MNS Pune Leader Vasant More Colour his Audi Car

वसंत मोरेंनीच फेसबुकवरुन कारबरोबरच फोटो पोस्ट केल्याने या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र या चर्चांना मोरेंनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र हा पूर्णविराम देताना त्यांनी या फोटोला दिलेली कॅप्शन मात्र चर्चेत आहेत. 

4/8

MNS Pune Leader Vasant More Colour his Audi Car

"ऑडी जुनीच आहे फक्त कलर नवीन केलाय", अशी कॅप्शन या फोटोंना वसंत मोरेंनी दिली आहे. वसंत मोरेंच्या या गाडीला आधी करडा होता. तो आता बदलून पांढरा करण्यात आला आहे.

5/8

MNS Pune Leader Vasant More Colour his Audi Car

वसंत मोरेंनी गाडीचे पाच फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन शेअर केले आहेत.

6/8

MNS Pune Leader Vasant More Colour his Audi Car

गाडी जुनीच असल्याचं सांगतानाच वसंत मोरेंनी एक उपहासात्मक टोलाही लागवला आहे. "नाहीतर खासदारकीला नाव आलंय उगाच गैरसमजाने गाडी पाहून ईडी वाले यायचे घरी," असं वसंत मोरेंनी फोटो कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

7/8

MNS Pune Leader Vasant More Colour his Audi Car

वसंत मोरेंनी शेअर केलेल्या गाडीच्या फोटोमध्ये गाडीला भलामोठा हार घातल्याचंही दिसत आहे.

8/8

MNS Pune Leader Vasant More Colour his Audi Car

वसंत मोरेंनी शेअर केलेल्या या पोस्टला सोशल मीडियावर शेकडोच्या संख्येनं कमेंट्स आल्या आहेत.