साधूचा शाप मिळालेली भारतातील रहस्यमयी ऐतिहासिक इमारत, जिवंत दफन झाली होती व्यक्ती; काय आहे नेमकं गूढ?

Travel News : भारतातील 'या' ऐतिहासिक वास्तूला शापमुक्त करण्यासाठी कोणी दिली प्राणाहुती? कैक वर्षे दडलेलं रहस्य समोर   

Oct 17, 2023, 15:43 PM IST

Travel News : देशातील बहुतांश भागांमध्ये काही ठिकाणं अशीही आहेत जी आपल्याला हैराण करून सोडतात. आपल्या मनात प्रश्नांचा काहूर माजवून जातात. भारतात अशा अनेक वास्तू आहेत ज्यांच्यामागं अशी काही रहस्य दडलीयेत जी रहस्य आपल्याला विचार करायला भाग पाडतात. 

 

1/7

मेहरानगढ

rajasthan jodhpur The Story Of Mehrangarh Fort And Its Curse

Rajasthan Jodhpur Mehrangarh History : भारतात अशा अनेक वास्तू आहेत ज्यांना ऐतिहासिक वारसा लाभला आहे. अशा वास्तूंमधील एक नजर रोखणारं ठिकाण म्हणजे राजस्थानच्या जोधपूरमध्ये असणारा मेहरानगढ. उभ्या खडकावर 400 फुटांच्या उंचीवर हा किल्ला स्थिरावला आहे. भारतातील सर्वात मोठ्या किल्ल्यांपैकी हा किल्लासुद्धा एक. 

2/7

या किल्ल्याचा इतिहास

rajasthan jodhpur The Story Of Mehrangarh Fort And Its Curse

जोधपूरमधील या किल्ल्यातून एकिकडे पाकिस्तान स्पष्ट दिसतं तर, दुसरीकडे किल्ल्याची हीच वास्तू एका शापामुळं अनेकांनाच धडकी भरवतो. 500 वर्षे मागं वळून पाहिल्यास या किल्ल्याचा इतिहास डोळ्यांसमोर येतो. जेव्हा जोधपूरचे शासक राव जोधा यांनी 1459 मध्ये या किल्ल्याच्या बांधकामास सुरुवात केली होती. महाराज जसवंत सिंह (1638-78) यांनी हा किल्ला पूर्णत्वास नेला.   

3/7

असं म्हणतात की..

rajasthan jodhpur The Story Of Mehrangarh Fort And Its Curse

असं म्हणतात की किल्ल्याच्या बांधकामापूर्वी इथं एका पाण्याच्या स्त्रोतापाशी राहत होते. जेव्हा राजानं किल्ल्याच्या बांधकामासाठी त्यांना तिथून जाण्यास सांगितलं तेव्हा साधूंनी त्यांना एक शाप दिला.   

4/7

क्षमायाचना केली

rajasthan jodhpur The Story Of Mehrangarh Fort And Its Curse

'हे राजा ज्या पाण्यासाठी तू मला इथून हटवतोयस, ते पाणी आटेल', असा शाप साधुपुरुषानं राजाला दिला. राजानं क्षमायाचना केली ज्यानंतर कुठे जाऊन साधुनं एक उपाय सुचवला. या शापातून मुक्त होण्यासाठी राज्यातील कोणाही एका व्यक्तीनं स्वइच्छेनं किल्याखाली स्वत:ला दफन करावं आणि प्राण त्यागावेत.   

5/7

श्रद्धांजी स्थळ

rajasthan jodhpur The Story Of Mehrangarh Fort And Its Curse

राजाला अशी कोणतीही व्यक्ती मिळेना. अखेर राजाराम मेघवाल नावाच्या एका व्यक्तीनं प्राण त्यागण्यासाठी पुढाकार घेतला. एका शुभदिनी मेघवालला गडाखाली पुरण्यात आलं आणि तिथून पुढं किल्ल्याचा पाया रचला गेला. राजाराम मेघवालला श्रद्धांजली देण्यासाठी किल्ल्यात एक श्रद्धांजी स्थळही उभारण्यात आलं. जेणेकरून येणाऱ्या पिढीला त्यांच्या त्यागाचा विसर पडणार नाही. 

6/7

जौहर स्थळ

rajasthan jodhpur The Story Of Mehrangarh Fort And Its Curse

मेहरानगढला सात दरवाजे असून, किल्ल्याच्या अंतिम दारापाशी म्हणजेच लोहपोलपाशी जौरहच्या खुणा आहेत. इथं 15 हून अधिक राण्यांच्या हातांचेही ठसे आहेत. 1843 मध्ये इथं महाराजा मान सिंह यांच्या निधनानंतर त्यांच्या राण्यांनी जौहर केला होता. 

7/7

गडाची सफर

rajasthan jodhpur The Story Of Mehrangarh Fort And Its Curse

मेहरानगढ तुम्हीही जवळून पाहू शकता. जोधपूरमध्ये वातावरणाचा मारा झेलत उभ्या असणाऱ्या या गडाची सफर करण्यासाठी तुम्हीही सहज पोहोचू शकता. त्यामुळं शक्य असेल तेव्हा जोधपूरला आणि मेहरानगढला नक्की भेट द्या.