कॉलेजमध्ये भेट ते लग्न... राम चरण आणि उपासनाची प्यारवाली लव्ह स्टोरी तुम्हाला माहितीये का?

Ram Charan and Upasana Love Story : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता राम चरणचा आज 27 मार्च रोजी 39 वा वाढदिवस आहे. राम चरण आणि त्याची पत्नी उपासनानं आज तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. सगळीकडे राम चरणसोबत दिसणारी त्याची पत्नी आणि त्याची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयीच जाणून घेऊया. 

| Mar 27, 2024, 18:08 PM IST
1/7

चरण आणि उपासना

राम चरण आणि उपासनाची लव्ह स्टोरी ही कोणत्याही चित्रपटाच्या पटकथेसारखीच आहे. त्या दोघांची भेट कॉलेजमध्ये असताना झाली होती. 

2/7

मैत्री

सुरुवातीला राम आणि उपासना हे फक्त मित्र होते. मग त्यानंतर ते बेस्ट फ्रेंड्स झाले आणि मग बेस्ट फ्रेंड फॉरेव्हर. 

3/7

राम शिवाय उपासनाला करमे ना

काही काळानंतर राम परदेशात गेला आणि तेव्हा उपासनाला त्याची इतकी सवय झाली होती की तिला त्याच्याशिवाय करमतच नव्हतं. 

4/7

रामला झाली जाणीव

रामला मगधीरा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान, उपासनासाठी त्याला फिलींग्स आहेत याची जाणीव झाली. चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर ते दोघं रिलेशनशिपमध्ये आले. 

5/7

लग्न

राम आणि उपासनाचं कुटुंब एकमेकांना बऱ्याच दिवसापासून ओळखत होते. त्यामुळे कोणत्याही गोष्टीची अडचण न येता त्यांचं लग्न झालं. 

6/7

लेकीचा जन्म

राम आणि उपासना हे 2012 मध्ये लग्न बंधनात अडकले आणि 2023 मध्ये उपासनानं त्यांच्या लेकीला जन्म दिला. त्यांच्या लेकीचं नाव क्लिन कारा कोनिडेल असं आहे. 

7/7

काय करते उपासना?

उपासना ही एक यशस्वी बिझनेसवूमन आहे आणि ती कोटींच्या घरातील बिझनेसची मालकीन आहे. (All Photo Credit : Social Media)