'मला आजही चीटर...' दीपिका, कतरिनासोबत ब्रेकअपविषयी पहिल्यांदाच बोलला रणबीर, तर 'वडील ऋषी कपूर हे रागीट...'
आलिया भट्टशी लग्न केल्यानंतर पहिल्यांदाच रणबीर कपूर दीपिका आणि कतरिनासोबतच्या ब्रेकअपबद्दल स्पष्ट बोलला आहे. त्याला देण्यात आलेल्या अय्याश 'या' टॅगवरही त्याने प्रतिक्रिया दिली आहे. एवढंच नाही तर वडिलांच्या निधनानंतर चार वर्षांनंतर त्यांचा स्वभावाबद्दल भाष्य केलंय.
नेहा चौधरी
| Jul 22, 2024, 11:15 AM IST
1/9

2/9

3/9

4/9

अलीकडेच WTF People या पॉडकास्टमध्ये रणबीर कपूर आला होता. निर्मात्यांनी नुकताच या आगामी भागाचा ट्रेलर रिलीज केलाय. तिथे त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला. तो म्हणाला की, 'माझ्या भूतकाळात मी दोन यशस्वी अभिनेत्रींना डेट केलं होतं. पण त्यानंतर हीच माझी ओळख बनली होती. लोकांनी मला कॅसानोव्हा आणि चीटरचा टॅग दिला.' तो पुढे म्हणाला की, 'मी अनेक वर्ष या लेबलसह जगलो किंवा आजही जगत आहे.'
5/9

6/9

7/9

या मुलाखतीत रणबीरने वडील ऋषी कपूरबद्दलही काही गोष्टी शेअर केल्या आहेत. तो म्हणाला की, 'माझं वडील खूप शॉर्ट-टेम्पर्ड स्वभावाचे पण खूप चांगले व्यक्ती होते. त्यांच्या डोळ्यांचा रंगही मी कधी पाहिला नाही. मी नेहमी त्याच्यासमोर मान खाली घालून उभा असायचो. त्यांना कधी नाही म्हटलंही नाही. ते जे काही बोलले ते मी शांतपणे स्वीकारले.'
8/9

9/9
