MS Dhoni, RCB VS CSK : धोनी जखमी, स्टोक्सही अनफीट; कोण करणार चेन्नईचं नेतृत्व?

राजस्थान रॉयर्ल (Rajastan Royals) विरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. जर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangluru) विरुद्ध खेळू शकला नाही तर संघाचे नेतृत्व कोण करणार? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

Apr 14, 2023, 22:32 PM IST

MS Dhoni injury RCB VS CSK : राजस्थान रॉयर्ल (Rajastan Royals) विरुद्ध झालेल्या सामन्यात धोनीला दुखापत झाल्याची बातमी समोर आली होती. जर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Royal Challengers Bangluru) विरुद्ध खेळू शकला नाही तर संघाचे नेतृत्व कोण करणार? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

1/6

राजस्थान विरुद्धच्या सामन्यानंतर सीएसकेचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी चिंताजनक बातमी दिली, धोनी गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

2/6

एकीकडे धोनी जखमी आहे तर दुसरीकडे बेन स्टोक्सही अनफीट आहे. त्यामुळे आता चेन्नईचं नेतृत्व कोण करणार? धोनीला पर्याय काय?

3/6

आयपीएलमध्ये (IPL 2023) रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ 17 एप्रिलला आमनेसामने असतील.

4/6

धोनी जर खेळला नाही तर स्टार ऑलराउंडर रविंद्र जडेजा किंवा मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडकडे कर्णधारपदाची जबाबदारी दिली जाऊ शकते.

5/6

ऋतुराज गायकवाड मागील 4 सामन्यांमध्ये दमदार परफॉर्मन्स करताना दिसतोय. त्याने चार सामन्यात 197 धावा केल्या आहेत.

6/6

दरम्यान, चेन्नईने आत्तापर्यंत या हंगामात 4 सामने खेळले आहेत. त्यातील 2 सामन्यात त्यांना विजय मिळवता आलाय.