Work From Home चा महिलांपेक्षा पुरुषांना झाला अधिक फायदा; संशोधकांचा दावा

Work From Home: कोरोनाच्या साथीदरम्यान लोकांनी घरुनच कामं केली. वर्क फ्रॉम होम कल्चर कोरोना कालावधीमध्ये सामान्य बाब झाली. आजही अनेकजण वर्क फ्रॉम होम करत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आल्यानंतर घरुन काम कसं होणार असा प्रश्न अनेकांना पडला. मात्र हळूहळू लोकांनी घरुन काम करणं हे दैनंदिन दिनक्रमाचा भाग म्हणून स्वीकारलं. वर्क फ्रॉम होम महिलांसाठी जास्त तणावपूर्ण मानलं जातं. कारण महिलांना शांततेत काम करण्यासाठी आवश्यक वातावरण घरामध्ये नव्हतं. त्यातही संपूर्ण कुटुंब एकत्र राहत असेल तर महिलांना घरुन काम करणं अधिक कठीण जायचं. मात्र पुरुषांवर वर्क फ्रॉम होमचा काय परिणाम झाला?

Jan 31, 2023, 16:06 PM IST
1/5

research shows working from home is more beneficial for dads as compares to moms

Work From Home: एका संशोधनामध्ये असं दिसून आलं आहे की वर्क फ्रॉम होम हे मातृत्व आणि कंपनीची जबाबदारी संभाळणाऱ्या महिलांसाठी नाही तर लहान मुलं असलेल्या पुरुषांसाठी जास्त फायद्याचं ठरलं. या अभ्यासामध्ये चीन आणि दक्षिण कोरियामधील जोडप्यांचा समावेश होता. यामध्ये असं दिसून आलं की महिलांपेक्षा पुरुष आपल्या मुलांसाठी अधिक वेळ द्यायचे. (सर्व फोटो - रॉयटर्स)

2/5

research shows working from home is more beneficial for dads as compares to moms

ओहियो स्टेट यूनिव्हर्सिटीने जारी केलेल्या या अभ्यासाच्या अहवालामध्ये असं दिसून आलं आहे की महिला जेव्हा घरुन काम करतात तेव्हा त्यांच्यावर अधिक ताण असतो. कंपनीचं काम करताना त्यांना आपल्या घरातील कामही करावं लागतं. तर दुसरीकडे पुरुष जेव्हा घरातील एखादं काम करायचे तेव्हा महिला त्यांना मदत करतात. पुरुषांवर कामाचा अधिक ताण पडू नये म्हणून महिला त्यांना हातभार लावण्यात आघाडीवर असल्याचं दिसून आलं.

3/5

research shows working from home is more beneficial for dads as compares to moms

हा अहवालातील काही गोष्टी धक्कादायक वाटू शकतात पण यामध्ये पुरुष हे महिलांपेक्षा वर्क-लाइफ बॅलेन्स करण्यात अधिक सक्षम असल्याचं दिसून आलं.

4/5

research shows working from home is more beneficial for dads as compares to moms

या अभ्यासादरम्यान असं दिसून आलं की पुरुष हे त्यांच्या पत्नीला कामामध्ये मदत करण्यासाठी अधिक वेळ देऊ शकतात. कारण महिलांच्या तुलनेत पुरुषांकडे घरुन काम करताना मोकळा वेळ अधिक असतो. घरगुती कामांची बरीचशी जबाबदारी महिला उचलतात. मात्र जेव्हा पुरुष यामध्ये मदत करतात तेव्हा हे काम वाटलं जातं आणि कमी वेळात आणि कष्टात हे काम करणं शक्य असतं.

5/5

research shows working from home is more beneficial for dads as compares to moms

महिला वर्क फ्रॉम होमदरम्यान कौटुंबिक कर्तव्य पूर्ण करण्यास प्राधान्य देतात. मात्र पुरुषांचं असं नसतं. ते आपल्या कामासंदर्भात अधिक फोकस असतात. संशोधनामध्ये असंही दिसून आलं आहे की महिला जेव्हा ऑफिसमधून घरी जातात तेव्हा त्यांना घरातील कामही करावं लागतं. पुरुषांबद्दल असं नसतं. हाच प्रकार वर्क फ्रॉम होमसंदर्भातही होतो.