वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी बनला अभिनेता, एका सीनमुळे बनला रोमान्सचा बादशाह, एकाच अभिनेत्रीसोबत केले 12 चित्रपट

बॉलिवूडमधील या अभिनेत्याने बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली होती. एकाच अभिनेत्रीसोबत 12 चित्रपटांमध्ये केलं काम. तुम्ही ओळखलं का?

Soneshwar Patil | Feb 13, 2025, 13:33 PM IST
1/7

हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते ऋषि कपूर यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीलाच सिद्ध केले की अभिनय त्यांच्या रक्तात आहे. त्यांच्या पहिल्याच चित्रपटाने त्यांना एका रात्रीत स्टार बनवले.

2/7

ऋषि कपूर यांनी त्यांच्या कारकि‍र्दीत बहुतेक रोमँटिक भूमिका केल्या. पण ऋषि कपूर यांचा अभिनयाच्या जगात प्रवेश त्यांच्या वडिलांसाठी वरदान ठरला.

3/7

ऋषि कपूर यांनी अनेक हिट आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यांच्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली. पण त्यांना नेहमीच खंत असायची की तो फक्त एकाच प्रकारची भूमिका करू शकत होता.

4/7

ऋषि कपूर यांनी अनेक मुलाखतींमध्ये सांगितले की, त्यांना डान्स कसा करायचा हे माहित नव्हते. परंतु, ते काम करत राहिले आणि प्रेक्षकांना त्यांचे काम आवडत राहिले.

5/7

ऋषी कपूर यांनी अभिनयाची सुरुवात अशा वेळी केली जेव्हा अ‍ॅक्शन चित्रपटांचे युग होते. अशातच तो रोमँटिक हिरो म्हणून प्रसिद्ध झाला. पण त्यांच्या चाहत्यांना त्यांची ही शैली खूप आवडली.

6/7

1989 मध्येही त्यांनी श्रीदेवीसोबत 'चांदनी' चित्रपटात काम केले. या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले. या चित्रपटातील  त्यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. रोमान्सचा बादशाह म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. 

7/7

राज कपूर यांचा मेरा ना जोकर चित्रपट फ्लॉप झाला तेव्हा त्यांच्यावर मोठ्या कर्जाचा भार पडला. त्यानंतर त्यांनी 'बॉबी' चित्रपट बनवला. तो हिट ठरला. या चित्रपटात त्यांनी त्यांच्या मुलाला कास्ट केले होते. त्यामुळेच ऋषि कपूर वडिलांचे कर्ज फेडण्यासाठी हिरो बनले असे म्हटले जाते.