घरातलं जुने सामान विकायला महिलेला द्यावे लागले 1.28 लाख रुपये, नेमकं काय घडलं?

लोक आता ऑनलाईन पद्धतीने मोठ्या प्रमाणावर व्यवहार करताना दिसत आहेत. यामध्ये खरेदी विक्रीचा देखील समावेश आहे. मात्र हीच चूक एका महिलेला चांगलीच महागात पडली आहे. ओलएक्सवर आपले जुने सामान्य विकण्यासाठी महिलेने जाहीरात दिल्यानंतर तिची तब्बल लाखभर रुपयांना फसवणूक झाली आहे.

Sep 18, 2023, 16:08 PM IST
1/8

OLX वर झाली मोठी फसवणूक

big scam happened on OLX

ओलएक्सवर आपले जुने सामान्य विकण्यासाठी महिलेने जाहिरात दिल्यानंतर तिची तब्बल लाखभर रुपयांना फसवणूक झाली आहे.

2/8

OLX वर विकायचे होते सामान

Goods to be sold on OLX

उषा किरण नावाची महिला सायबर फसवणुकीची बळी ठरली आहे. या महिलेला तिच्या घरातील काही सामान ओएलएक्सवर विकायचे होते. हे प्रकरण कर्नाटकातील आहे

3/8

काय आहे OLX?

What is OLX

पीडित महिलेने ओएलएक्सवर जुन्या वस्तूंची विक्री करण्यासाठी पोस्ट टाकली होती.ओएलएक्स हे जुन्या वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे.

4/8

OLX वर खरेदीदार सापडला

Found a buyer on OLX

जुन्या वस्तूंची ओएलएक्सवर पोस्ट येताच पीडितेला एक मेसेज आला आणि तिने ती वस्तू खरेदी करण्यात रस दाखवला. 

5/8

एका महिलेचा फोन आला अन्...

online fraud

पीडित महिलेला एका महिलेचा फोन आला. तिने सांगितले की तिला ती वस्तू खरेदी करायची आहे. यासाठी महिलेने सांगितले की, तिच्याकडे रोख रक्कम नाही, तिला ऑनलाइन पैसे ट्रान्सफर करायचे आहेत.

6/8

आरोपीने पाठवला QR कोड

QR code sent by the accused

सगळं ठरल्यानंतर पीडितेला आरोपीने एक क्यूआर कोड पाठवला. पीडितेने तो कोड स्कॅन करताच तिच्या खात्यातून 1,28,496 रुपये त्या क्यूआर कोडच्या खात्यात ट्रान्सफर झाले.

7/8

तीन अकाऊंटमधून गेले पैसे

Money passed through three accounts

माध्यमांच्या वृत्तानुसार ही रक्कम तीन वेगवेगळ्या खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आली आहे. यानंतर महिलेला समजले की तिची ऑनलाईन फसवणूक झाली आहे.

8/8

पोलिसांत तक्रार दाखल

Filed a complaint with the police

ऑनलाइन फसवणूकीची माहिती पीडितेने पोलिसांना दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, अद्याप या प्रकरणात कोणाला अटक झाल्याची माहिती समोर आलेली नाही. (सर्व फोटो - freepik.com)