Serial Killer Sisters: कोण होत्या गावित बहिणी, ज्यांना कोर्टाने दिली होती फाशीची शिक्षा

देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली आणि मोनिंदर पंढेर या दोन आरोपींची फाशीची शिक्षा अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निकाल दिला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने या दोघांची निर्दोष मुक्तता केली. हा पहिलाच खटला नाहीये जिथे आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आलीये. यापूर्वीही महाराष्ट्रात अशी एक घटना घडली होती त्यासंपूर्ण देश हादरला होता. गावित हत्याकांडातील आरोपी रेणुका आणि सीमा गावित या बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली होती. जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण

| Oct 16, 2023, 15:15 PM IST

Gavit Sister Case: देशभरात गाजलेल्या निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली आणि मोनिंदर पंढेर या दोन आरोपींची फाशीची शिक्षा अलाहाबाद उच्च न्यायालयाने रद्द करण्याचा निकाल दिला आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने या दोघांची निर्दोष मुक्तता केली. हा पहिलाच खटला नाहीये जिथे आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आलीये. यापूर्वीही महाराष्ट्रात अशी एक घटना घडली होती त्यासंपूर्ण देश हादरला होता. गावित हत्याकांडातील आरोपी रेणुका आणि सीमा गावित या बहिणींची फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली होती. जाणून घेऊया काय आहे हे प्रकरण

1/7

Serial Killer Sisters: कोण होत्या गावित बहिणी, ज्यांना कोर्टाने दिली होती फाशीची शिक्षा

Serial killer sisters of Maharashtra know the case of gavit sister in marathi

नव्वदीच्या दशकात घडलेले बालहत्याकांडाबाबत ऐकून अजूनही अंगावर भीतीने काटा येतो. अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी निष्पाप बालकांचा निर्घृण खून केला. 1990 ते 1996 या काळात जवळपास 13 बालकांचे अपहरण आणि त्यातील ९ मुलांची त्यांनी निर्घृण हत्या केली. गावित हत्यांकाडातील आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करुन त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. असं म्हणतात गावित बहिणींनी 40 बालकांची हत्या केली मात्र, त्यातील कोर्टात हे सिद्ध होऊ शकलं नाही.  

2/7

1990 ते 1996

Serial killer sisters of Maharashtra know the case of gavit sister in marathi

 बालहत्याकांडाची मास्टरमाइंड ही अजंनाबाई गावित ही होती. 1990च्या काळात रेणुका आणि सीमा यांच्यासोबत मिळून तिने हे हत्याकांड घडवून घडले होते. यातील रेणुकाचा पतीही यात सहभागी होती. या तिघांनी मिळून 1990 ते 1996 याकाळात कोल्हापूर, नाशिक, पुणे आणि मुंबईसह अनेवक भागातील 13 हून अधिक मुलांचे अपहरण केले. यामुलांचा वापर करुन त्या मंदिरात व गर्दीतील ठिकाणी चोरी करत असे.   

3/7

अंजनाबाई मास्टरमाइंड

Serial killer sisters of Maharashtra know the case of gavit sister in marathi

1990मध्ये या घटनांची सुरूवात झाली. अंजनाबाई ही उदरनिर्वाहासाठी पाकिट मारणे, चोऱ्या करणे हे प्रकार करत होती. रेणुका आणि सीमा देखील यात सहभागी झाल्या. चोऱ्यामाऱ्या करणाऱ्या या मायलेकींना पुणे पोलिसांनी 15 ते 20 वेळा पकडलं. 

4/7

मुलांचे अपहरण करण्यास सुरुवात

Serial killer sisters of Maharashtra know the case of gavit sister in marathi

मंदिरात पाकिटमारी करत असताना लोकांनी या गावित बहिणींना पकडलं तेव्हा गर्दीत आपल्याकडील मुलं त्या व्यक्तीच्या पायावर ठेवून त्यांनी सुटका करुन घेतली. यातील एका प्रसंगात मुलांमुळं लोकांची सहानुभूती मिळते हे लक्षात आल्यानंतर ते चोरी करण्यासाठी मुलांच्या अपहरणाचा कट रचला. 1990मध्ये कोल्हापूर स्थानकातून एका भिकारी महिलेचे त्यांना बाळ चोरले.   

5/7

निर्घणपणे हत्या

Serial killer sisters of Maharashtra know the case of gavit sister in marathi

चोरी करण्यासाठी त्या लहान मुलांचे अपहरण करायचे आणि मुलं त्रास देऊ लागली की त्यांना निर्घणपणे ठार करायचे. कधी गळा दाबून तर कधी फरशी किंवा भिंतीवर आपटून या मुलांची हत्या करत होता. मुलांच्या मृतदेहाची विल्हेवाट हा रेणुकाचा पती किरण शिंदे लावायचा. 

6/7

अंजनाबाईचा मृत्यू

Serial killer sisters of Maharashtra know the case of gavit sister in marathi

अंजनाबाई, सीमा, रेणुका आणि किरण यांनी सलग सहा वर्ष हा प्रकार सुरू ठेवला. मोठ्या शिताफिने पोलिसांनी या हत्याकांडाचा छडा लावला. यातील किरण हा माफीचा साक्षीदार ठरला तर, 1997 साली अंजनाबाई हिचा कारागृहात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. 

7/7

मरेपर्यंत जन्मठेप

Serial killer sisters of Maharashtra know the case of gavit sister in marathi

रेणुका आणि सीमा या बहिणीवर बालहत्याकांडाचा खटला सुरू झाला. न्यायालयाने पहिले दोघींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र,मुंबई उच्च न्यायालायात फाशीच्या शिक्षेचे रुपांतर जन्मठेपेत करण्याची याचिका दाखल केली. मुंबई न्यायालयानेही याचिका स्वीरारत दोघींना जन्मठेपीची शिक्षा सुनावली. दोघींनाही मरेपर्यंत जन्मठेप ही शिक्षा दोघीही भोगतील