शिवसेनेच्या 57 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच....; पाहा वर्धापन दिनी हे काय घडतंय

Shivsena 57 th foundation day : महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पक्षानं बरीच सत्तांतरं, वादळ, मानापमान नाट्य आणि इतकंच काय तर, पक्षांतर्गत धुसफूसही पाहिली.

Jun 19, 2023, 07:59 AM IST

Shivsena 57 th foundation day : शिवसेना... म्हणजे अनेकांसाठी ताठ मानेनं जगायला शिकवणारा पक्ष, अनेकांसाठी एकनिष्ठा म्हणजे काय हे दाखवून देणारा पक्ष आणि अनेकांसाठीच आधार. महाराष्ट्राच्या राजकारणात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या पक्षानं बरीच सत्तांतरं, वादळ, मानापमान नाट्य आणि इतकंच काय तर, पक्षांतर्गत धुसफूसही पाहिली.

1/9

पक्षातील बंडखोरी

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

Shivsena 57 th foundation day : आज या पक्षाचा 57 वा वर्धापन दिन. आतापर्यंतच्या इतिहासात शिवसेनेचे दोन वर्धापन दिन साजरा होण्याची ही पहिलीच वेळ. पक्षातील बंडखोरीनंतर हे असं काहीतरी होण्याचा हा विचित्र योगायोग. अनेकांच्याच तो पचनी पडत नसला तरीही सद्यस्थिती हीच! 

2/9

ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

एकनाथ शिंदे याच्या गटाला शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे मिळाल्यानंतरही ठाकरे गटाकडून आम्हीच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला जात असल्यामुळं दोन्ही गटांकडून आज शिवसेनेचे दोन वेगळे वर्धापन दिन साजरे होणार आहेत.

3/9

शिवसेनेचा मूळ चेहराच अनेकजण आजही शोधताहेत

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

उद्धव ठाकरे यांच्यापुढे सध्या असणाऱी आव्हानं पाहताना अनेक शिवसैनिकांनी त्यांना साथ दिल्याचं पाहायला मिळत आहे. मुळात राजकीय खेळीमध्ये अनेकांनी आपल्या पोळ्या शेकल्या पण, यामध्ये शिवसेनेचा मूळ चेहराच अनेकजण आजही शोधताना दिसत आहेत. चला तर मग, थोडं भूतकाळात डोकावूया... 

4/9

बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रं चांगलीच लोकप्रिय

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

साधारण 1960 मध्ये डोकावलं असता फ्री प्रेस जर्नलमधून बाळासाहेबांनी काढलेली व्यंगचित्रं चांगलीच लोकप्रिय होऊ लागली आणि दरम्यानच्या काळात व्यंगचित्रांसाठी स्वतंत्र साप्ताहिक असावं या भावनेतून व्यंगचित्रांचं साप्ताहिक ‘मार्मिक’ सुरु झालं. प्रकाशन सोहळ्यासाठी मुख्य उपस्थिती होती राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची.   

5/9

मराठी माणसाला खडाडून जाग आली

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

पुढे मराठी माणसाला खडाडून जाग आली आणि त्याला संघटित करण्यासाठी म्हणून बाळासाहेबांनी एका संघटनेची सुरुवात करण्य़ाचं ठरवलं. प्रबोधनकारांनी या संघटनेला नाव सुचवलं शिवसेना. १९ जून 1966 हा तोच दिवस, जेव्हा महाराष्ट्रातून शिवसेनेनं पहिली डरकाळी फोडली.   

6/9

मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवत राजकारणात उडी

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

मराठी माणसाला केंद्रस्थानी ठेवत राजकारणात उडी मारलेल्या उतरलेल्या शिवसेनेनं अवघ्या एका वर्षात ठाणे नगरपालिकेवर वर्चस्व मिळवलं. 1968  मध्ये मुंबई महापालिकाही शिवसेनेचीच झाली. बाळासाहेब नावाचं वादळ महाराष्ट्रभर व्यापत चाललं होतं.   

7/9

सीमाप्रश्न हाती घेत ...

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

पुढे सीमाप्रश्न हाती घेत झालेल्या आंदोलनांप्रकरणी बाळासाहेबांना अटक झाली, शिवसेनेची आंदोलनं वाढली आणि पक्षाची भूमिका अधिक आक्रमक पद्धतीनं मांडण्यासाठी 23 जानेवारी 1989 ला 'सामना' मुखपत्र सुरु झालं. 

8/9

अवघ्या सात वर्षात राज्यात शिवसेनेची राज्यात सत्ता

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

1988 मध्ये शिवसेनेचा फक्त एक आमदार राज्याच्या विधानसभेत होता ज्यानंतर अवघ्या सात वर्षात राज्यात शिवसेनेची राज्यात सत्ता आली. मनोहर जोशी यांच्या वाट्याला मुख्यमंत्रीपद आलं. 

9/9

बाळासाहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला

Shivsena 57 th foundation day balasaheb thackeray uddhav thackeray eknath shinde

गिरीश व्यास प्रकरणी जोशींवर आरोप होताच, बाळासाहेबांनी त्यांचा राजीनामा घेतला आणि नारायण राणेंना मुख्यमंत्रिपद दिलं. पुढच्या निवडणुकीत युतीची सत्ता गेली. पण मधल्या काही वर्षांचा अपवाद वगळला तर मुंबई महापालिकेवर मात्र शिवसेनेची सत्ता कायम राहिली. तेव्हापासून आतापर्यंत महाराष्ट्र आणि शिवसेना हे समीकरण अबाधित राहिलं. पण, आता मात्र हे सूर काहीसे वेगळ्याच मार्गानं लागल्याचं पाहायला मिळालं आणि खरा मराठी माणूस मात्र पेचात पडला.