मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा; शरद पवारांच्या पाठीशी उभा राहणारा श्रीनिवास पाटील नावाचा भक्कम मित्र

Sharad Pawar Shrinivas patil : सातारा, पाऊस आणि सच्चा दोस्त! शरद पवार यांना श्रीनिवास पाटील यांची हक्काची साथ. पडत्या काळात एकमेकांना साथ देणारे दोन नेते एकाच ठिकाणी; राजकारणाहून मैत्रीचं नातं जास्त महत्त्वाचं... 

Jul 03, 2023, 12:58 PM IST

Sharad Pawar Shrinivas patil : पक्षांतर्गत दुफळीनंतर 8 आमदारांसह विश्वासातल्या आणि कुटुंबातील एक सदस्य असणाऱ्या अजित पवार यांनी शरद पवार यांच्याशी बंड केलं आणि त्यांनी सत्तेत असणाऱ्या शिंदे- फडणवीस गटासोबत जात राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी शपथ घेतली. हादरवणाऱ्या या बंडानंतर शरद पवार यांनी त्यांच्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं आणि दुसऱ्याच दिवशी गुरुपौर्णिमेचं निमित्त साधत कराडचं प्रीतीसंगम गाठलं. 

1/8

गोष्ट मैत्रीच्या नात्याची...

Shriniwas Patil ncp chief Sharad Pawar friendship political relations latest news satara

बंडखोरी असो वा मुसळधार पाऊस; शरद पवारांच्या पाठीशी उभा राहणारा श्रीनिवास पाटील नावाचा भक्कम मित्र

2/8

साताऱ्याशी पवारांचं खास नातं

Shriniwas Patil ncp chief Sharad Pawar friendship political relations latest news satara

हादरवणाऱ्या या बंडानंतर शरद पवार यांनी त्यांच्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळलं आणि दुसऱ्याच दिवशी गुरुपौर्णिमेचं निमित्त साधत कराडचं प्रीतीसंगम गाठलं. साताऱ्याशी पवारांचं खास नातं... 

3/8

आदरांजली

Shriniwas Patil ncp chief Sharad Pawar friendship political relations latest news satara

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि राजकीय गुरु असणाऱ्या यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळापुढं शरद पवार यांनी आदरांजली वाहिली. तिथंच पावसानंही हजेरी लावली आणि आठवली साताऱ्यातील 'ती' सभा.   

4/8

आपल्या माणसांची साथ

Shriniwas Patil ncp chief Sharad Pawar friendship political relations latest news satara

आपल्या नेत्याला साथ देण्यासाठी यावेळी कार्यकर्त्यांची तोबा गर्दी झाली. या गर्दीत प्रत्येकजण हक्कानं पवारांची साथ देण्यासाठी आला होता. अगदी पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांचे मित्र श्रीनिवास पाटील यांचाही यात सहभाग होता.   

5/8

गोरगरीबांना न्याय देणारा नेता..

Shriniwas Patil ncp chief Sharad Pawar friendship political relations latest news satara

राजकारणात पुरोगामी धोरण स्वीकारलं, ज्या नेत्यानं गोरगरीबांना न्याय दिला त्या माझ्या मित्राची कायमच साथ देईन असं माध्यमांशी संवाद साधताना साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी स्पष्ट केलं. 

6/8

श्रीनिवास पाटील

Shriniwas Patil ncp chief Sharad Pawar friendship political relations latest news satara

याच श्रीनिवास पाटील यांच्या सभेसाठी 2019 मध्ये शरद पवार यांनी हजेरी लावल भर पावसात सभा घेतली होती. बरसणाऱ्या वरुणराजापुढं त्यानं नमतं घेतलं नाही आणि या एका सभेनं राजकीय समीकरणं बदलली. मित्र म्हणून पवारांनी दिलेली ही साथ पाटील विसरलेले नाहीत.   

7/8

दोन मित्रांमधील नातं

Shriniwas Patil ncp chief Sharad Pawar friendship political relations latest news satara

पावलोपावली त्यांनी पवारांना असणारी साथ आणि त्यांच्या निर्णयांप्रती वाटणारा विश्वास यातून हेच कायम व्यक्त होत राहिलं. कराडमधील प्रीतीसंगमावरही या दोन मित्रांमधील नात्यानं सर्वांच्याच मनाचा ठाव घेतला. 

8/8

संपूर्ण राजकीय वर्तुळ एकिकडे

Shriniwas Patil ncp chief Sharad Pawar friendship political relations latest news satara

संपूर्ण राजकीय वर्तुळ आणि खेळी एकिकडे आणि 60-65 वर्षांहून अधिक वर्षांपासूनची मैत्री दुसरीकडे असंच काहीसं चित्र यावेळी खूप काही बोलून गेलं.