भारतात एक राज्य असही जिथे ट्रेन सोडाच रेल्वे ट्रॅकही नाही; पर्यटक येथे पोहचतात तरी कसे?

भारतातील एकमेव राज्य जिथे अद्याप रेल्वे पोहलेली नाही.   

Mar 27, 2024, 17:01 PM IST

Sikkim Railway Station : भारताच्या कानाकोपऱ्यात रेल्वे पोहचली आहे. भारतातील प्रत्येक राज्यातून रेल्वे धावते. मात्र, भारतात एक असे राज्य आहे जिथे अद्याप रेल्वे पोहचलेली नाही.  येथे ट्रेन सोडाच रेल्वे ट्रॅकही नाही.

1/7

भारतीय रेल्वेचे जाळे काश्मिरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरलेले आहे. मात्र, एक राज्य असं आहे जिथे अद्याप रेल्वे पोहचलेली नाही.   

2/7

सिक्कीम राज्य देखील आता रेल्वेने देशाला जोडले जाणार आहे. सिक्कीममधील  शिवोक ते रांगपो दरम्यान सुमारे 44.96 किमी रेल्वेमार्ग तयार करण्यात येत आहे. या रेल्वे मार्गामुळे सिक्कीची राजधानी असलेल्या गँगटोकपर्यंत थेट रेल्वेने जाता येणार आहे.  

3/7

 सिक्कीम मध्ये राहणाऱ्या नागरिकांना तसेच येथे येणाऱ्या पर्यटकांना पश्चिम बंगाल या राज्यातील न्यू जलपाईगुडी आणि सिलीगुडी ये रेल्वे स्थानकातून ट्रेन पकडावी लागते. सिक्कीमपासून  न्यू जलपाईगुडी स्टेशन 187 किमी अतंरावर आहे. तर सिलीगुडी स्टेशन 146 किमी अंतरावर आहे.  

4/7

सिक्कीम राज्यात एकही रेल्वे रुळ नाही. त्यामुळे तिथे कोणतीही ट्रेन धावत नाही. यामुळे येथे राहणाऱ्या नागरीकांना तसेच येथे फिरण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना दुसऱ्या राज्यात जावून ट्रेन पकडावी लागते.   

5/7

निसर्गसौंदर्यांने आणि खास ट्राईबल संस्कृती जपणाऱ्या सिक्कीम या राज्याला लाखो पर्यटक भेट देत असतात. 

6/7

पूर्वोत्तर भारतात येणारे सिक्कीम हे अनेक पर्यटकांच्या बकेट लिस्टमध्ये असणारे राज्य आहे.  

7/7

देशाला स्वातंत्र्या मिळून 75 वर्षे उलटून गेली तरी भारतातील सिक्कीम या राज्यात अद्याप रेल्वे सेवा पोहचलेली नाही.