मोबाईल क्रमांक वापरण्याचेही मोजावे लागणार पैसे! नाही वापरलात तर वेगळा भुर्दंड

 मोबाईल नंबर ही एक सरकारी संपत्ती असून जी मूल्यवान आणि मर्यादित आहे. 6 जून 2024 ला जाहीर झालेल्या कन्सल्टिंग पेपरमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.

| Jun 13, 2024, 21:55 PM IST

Sim card fee: मोबाईल नंबर ही एक सरकारी संपत्ती असून जी मूल्यवान आणि मर्यादित आहे. 6 जून 2024 ला जाहीर झालेल्या कन्सल्टिंग पेपरमध्ये याची माहिती देण्यात आली आहे.

1/10

मोबाईल क्रमांक वापरण्याचेही मोजावे लागणार पैसे! नाही वापरलात तर वेगळा भुर्दंड

Sim card fee trai penalty Technology Marathi News

आतापर्यंत तुम्हाला मोबाईल रिचार्जचे पैसे द्यावे लागत होते. आता तुम्हाला मोबाईल किंवा लॅंडलाईन नंबर ठेवण्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतील. 

2/10

मूल्यवान आणि मर्यादित

Sim card fee trai penalty Technology Marathi News

मोबाईल नंबर ही एक सरकारी संपत्ती असून जी मूल्यवान आणि मर्यादित आहे. 6 जून 2024 ला जाहीर झालेल्या कन्सल्टिंग पेपरमध्ये याची माहिती देण्यात आली आहे. 

3/10

नवीन नंबरिंग योजना

Sim card fee trai penalty Technology Marathi News

भारतात मोबाईल युजर्सची संख्या वेगाने वाढतेय. यासाठी TRAI नवीन नंबरिंग योजनेचा प्लान आखतेय. स्प्रेक्ट्रमनुसार फोन नंबर देण्याचा अधिकार सरकारकडे आहे. 

4/10

दंड आकारण्याचा विचार

Sim card fee trai penalty Technology Marathi News

तुम्हीही दोन सिमकार्ड वापरत असाल तर  एका फोनमध्ये दोन सिमकार्ड वापरणाऱ्यांवर सरकार दंड आकारण्याचा विचार करत आहे. 

5/10

नंबरचा गैरवापर टाळण्यासाठी

Sim card fee trai penalty Technology Marathi News

टेलिकॉम रेग्युलेटरने यासंदर्भात एक प्रस्ताव तयार केला आहे. नंबरचा गैरवापर टाळण्यासाठी हा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे नियामकाने म्हटले आहे.

6/10

फक्त एकच सिम वापरात

Sim card fee trai penalty Technology Marathi News

आजकाल प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये दोन सिमकार्ड आहेत. असे असताना ते फक्त एकच सिम वापरत आहेत. 

7/10

सिमकार्डच्या बदल्यात शुल्क

Sim card fee trai penalty Technology Marathi News

मोबाइल क्रमांक ही सरकारची मालमत्ता आहे आणि ते दूरसंचार कंपन्यांना एका निश्चित मर्यादेसाठी दिले जातात. अशा परिस्थितीत सरकार सिमकार्डच्या बदल्यात शुल्क वसूल करू शकते.

8/10

संख्या कमी होण्याच्या भीतीने

Sim card fee trai penalty Technology Marathi News

लोक दोन सिमकार्ड ठेवतात.  ग्राहकांची संख्या कमी होण्याच्या भीतीने दूरसंचार कंपन्याही हे सिमकार्ड बंद करत नाहीत.

9/10

फी वर्षातून एकदा

Sim card fee trai penalty Technology Marathi News

नियामकानुसार, सिम कार्डवर एक निश्चित शुल्क आकारले जाऊ शकते जे वार्षिक असेल म्हणजेच फी वर्षातून एकदा भरावी लागेल. 

10/10

अनेक देशांमध्ये अशी व्यवस्था

Sim card fee trai penalty Technology Marathi News

जगातील अनेक देशांमध्ये अशी व्यवस्था आधीच अस्तित्वात आहे. या यादीमध्ये ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, बेल्जियम, फिनलंड, ब्रिटन, लिथुआनिया, ग्रीस, हाँगकाँग, बल्गेरिया, कुवेत, नेदरलँड, स्वित्झर्लंड, पोलंड, नायजेरिया, दक्षिण आफ्रिका आणि डेन्मार्क या देशांचा समावेश आहे.