आकार फक्त 2.4 सेमी, किंमत 600 कोटी; अंबानी, अदानी नाही तर 'या' व्यक्तीकडे आहे जगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती

जगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती सुरतमधील एका व्यापाऱ्याकडे आहे. जाणून घेऊया या मूर्तीची खास वैशिष्ट्ये...

| Sep 06, 2024, 23:53 PM IST

600 Crore Diamond Ganesha Idol In Surat : सोन्या चांदीच्या गणेश मूर्ती आपण नेहमीच पाहतो. मात्र, सोन्या चांदीपेक्षा अधिक मौल्यवान अशा दुर्मिळ धातूची गणेश मूर्ती सुरत मधील एका व्यापाऱ्याकडे आहे. फक्त 2.4 सेमी आकार असलेल्या या गणेश मूर्तीची किंमत 600 कोटी रुपये इतकी आहे. ही  जगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती आहे. 

1/7

 गुजरातमधील सुरतचे व्यापारी राजेश भाई पांडव यांच्याकडे जगातील सर्वात महागडी गणेश मूर्ती आहे. आकाराने अतिशय लहान असलेल्या गणेश मूर्तीची किंमत तब्बल 600 कोटींच्या आसपास आहे. 

2/7

ही गणेश मूर्ती आमच्या कुटुंबासाठी गुडलक ठरल्याचे राजेश भाई सांगतात. 

3/7

दक्षिण आफ्रिकेत एका लिलावादरम्यान राजेश भाई यांनी गणेश मूर्तीप्रमाणे आकार असलेला हा हिरा खरेदी केला. 

4/7

या हिऱ्याचा आकारच गणेश मूर्ती सारखा आहे. यामुळे याला कोणातही कट देण्यात आलेला नाही किंवा याला पॉलिशही करण्यात आलेले नाही. 

5/7

या हिऱ्याचे वैशिष्टय म्हणजे याला कोणताही कट देण्यात आलेला नाही. एका अखंड हिऱ्यात ही गणेश सकारलेली आहे.    

6/7

हा हिरा जगातील सर्वोत्तम हिऱ्यांपैकी एक आहे. यामुळेच सोनं चादींपेक्षा ते अधिक मूल्यवान आहे. 

7/7

राजेश भाई यांच्याकडे असलेली गणेश मूर्ती ही एका र्मिळ धातूची बनलेली आहे. हा धातू म्हणजे दुर्मिळ हिरा आहे.