Skin Care Tips: एका रात्रीत गायब होतील चेहऱ्यावरील सुरकुत्या, करा 'हे' घरगुती उपाय

Skin Care Tips In Marathi: चेहऱ्यावरील पिंपल्स, डाग, सुरकुत्या नसाव्या असा प्रत्येकाला वाटतं असतं. प्रत्येकाल आपण सुंदर दिसावे असे वाटत असते. यासाठी पौष्टीक आहार, व्यायामही तितकाच गरजेचा आहे. वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्यांची दिसण्याची समस्या हळूहळू दिसायला लागतात. यावर तुम्ही घरगुती उपाय करुन सुरकुत्या कमी करु शकता.

Jan 24, 2024, 15:53 PM IST
1/7

कोरफड

त्वचेसाठी कोरफड बदामाच्या तेलाप्रमाणे, तुम्ही ते रात्रभर मास्क म्हणून वापरू शकता आणि त्वचा घट्ट करू शकता. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर कोरफडीचे ताजे जेल लावल्यास चांगले होईल.

2/7

नारळाचे तेल

नारळाचे तेल  त्वचेच्या अनेक समस्यांवर गुणकारी ठरते. नारळाचे तेल आणि ऑलिव्ह ऑईलमध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या त्वचेचे फ्री रेडिकल्सपासून संरक्षण होते. त्वचाला मऊपणा मिळतो ज्यामुळे त्वचा हायड्रेट राहते. 

3/7

जायफळ

जायफळ पावडर अॅंटिऑक्सिडंट्स आणि फिनोलिक संयुगे समृद्ध आहे. हे त्वचा आणि केसांच्या आरोग्यास प्रोत्साहन देते. डार्क स्पॉट्सच्या उपचारासाठी तुम्ही जायफळचा वापर करु शकता. 

4/7

मध

मधात स्वीटनर असते ते माईश्चराईजरचे काम करते. मधामुळे सुरकुत्या दूर होतात असे नाही तर त्यातील अॅंटीऑक्सीडेंटमुळे त्वचाही हेल्दी राहते. 

5/7

गुलाबपाणी

गुलाबपाणी, लिंबू आणि ग्लिसरिनमुळे तुमची त्वचा स्वच्छ, मुलायम आणि चमकदार होते. गुलाबपाण्यामुळे डोळ्याखालील काळी वर्तुळे देखील कमी होण्यास मदत होते. त्वचेला तजेला आल्यामुळे त्वचेचा सैलपणा कमी होतो आणि तुम्ही तरूण दिसू लागता. 

6/7

केळ

त्वचेसाठी केळं उत्तम. यात अॅंटी एजिंग, व्हिटॉमिन ए आणि बी असल्याने त्वचा उजळण्यास मदत होते. पिकलेले केळं कुस्करा. त्यात मध आणि गुलाबजल घाला. त्यानंतर त्यात दही घाला. चेहऱ्याला पेस्ट लावण्यानंतर 10 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करा. 

7/7

बदाम

बदामामुळे त्वचेवरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचा पुन्हा सतेज व उजळ दिसू लागते. पाच ते सहा बदाम रात्रभर दूधात भिजत ठेवून सकाळी ते खा. यामुळे तुमच्या चेहऱ्यात फरक जाणवेल.