थकवा दूर करण्यासाठी फक्त झोप पुरेशी नाही, 'या' गोष्टी ही करणं आवश्यक

Sleep : थोडंफार बरं वाटत नसलं तरी थोडीशी झोप काढ बरं वाटेल असं कायम सांगितलं जातं. मात्र फक्त योग्य झोप काढल्याने तुमचा थकवा दूर होणार नाहीये

Jan 29, 2023, 19:18 PM IST
1/5

sleeping rest

पुरेशी झोप घेऊन तुम्ही अनेक आजारांना दूर ठेवू शकता असं अनेकदा सांगितलं जातं. मात्र तुमची आरोग्य व्यवस्था सुरळीत राहावी यासाठी फक्त पुरेशी झोप महत्त्वाची नाही.

2/5

Physical Rest

1. Physical Rest - शारीरिक आराम करण्याचे दोन प्रकार असतात. निष्क्रिय आणि सक्रिय. निष्क्रियमध्ये पुरेशी झोप किंवा एखादी 15-20 मिनिटासाठी डुलकी घेणं याचा समावेश आहे. तर योगा, व्यायाम आणि मसाज थेरेपी हे सक्रिय प्रकारात मोडते. यामुळे तुमचा चांगला आराम होऊ शकतं.

3/5

Mental Rest

2. Mental Rest - आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढलाय. कामाच्या प्रेशरमुळे चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणं किंवा कामावर लक्ष लागणं असे प्रकार घडतात. त्यामुळे रात्री झोपताना हे सर्व विचार डोक्यातून काढून टाकणं आवश्यक आहे. दिवसभरात जे काही घडलं आहे, यातून ब्रेक घेऊन सात-आठ तासांची पुरेशी झोप घ्यावी.  

4/5

Sensory Rest

3. Sensory Rest - कॉम्प्युटरची स्क्रीन, मोबाईल स्क्रीन किंवा झूम कॉल, व्हिडिओ कॉलवर बोलण्याची गरज नसल्यास शक्यतो टाळा. या सर्वांचा आपल्या संवेदनांवर मोठा ताण पडतो. यापासून मुक्त होण्यासाठी रात्री झोपेच्यावेळी किमान एक तास सर्व गॅजेट्स बंद करा किंवा त्यापासून दूर राहा.

5/5

sleeping

4. Social Rest - जर एखाद्या व्यक्तीला इमोशनल रेस्टची गरज आहे, तर त्याला सोशल रेस्ट घेणं ही तितकच आवश्यक आहे. जेव्हा नात्यात ताणतणाव निर्माण होतात. आपण हे ओळखण्यात अपयशी ठरतो की आपल्याला त्या नात्यापासून स्वतःला दूर ठेवायचं असतं मात्र ते तसं होतं नाही. तेव्हा तुम्हाला सकारात्मक विचार करणं आणि नकारात्मक लोकांपासून लांब राहणं गरजेचं आहे.