पती झहीर इक्बालच्या बहिणीच्या लग्नात पोहोचली सोनाक्षी सिन्हा, वधू आणि नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज

अभिनेता झहीर इक्बाल अलीकडेच त्याच्या बहिणीच्या लग्नाला उपस्थित होता. जिथे त्याची पत्नी सोनाक्षी सिन्हा देखील पोहोचली होती. 

Soneshwar Patil | Feb 08, 2025, 16:51 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने अभिनेता झहीर इक्बालशी लग्न केलं आहे. लग्नानंतर अभिनेत्री पतीसोबत वेळ घालवत आहे. 

2/7

अलिकडेच अभिनेत्री पती झहीर इक्बालच्या बहिणीच्या लग्नात आनंद घेताना दिसली. नुकतेच झहीरने बहिणीच्या लग्नातील फोटो शेअर केले आहेत. 

3/7

फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल हे कुटुंबासह लग्नाचा आनंद घेताना दिसत आहेत. 

4/7

या फोटोंमध्ये सोनाक्षी सिन्हा वेगवेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. काही फोटोंमध्ये ती झहीर आणि तिच्या मित्रांसोबत मजा करताना दिसत आहे.

5/7

तर काही फोटोंमध्ये अभिनेत्री झहीरसोबत सेल्फी घेताना दिसत आहे. ज्यामध्ये सोनाक्षीने लाल रंगाचा सूट परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

6/7

तसेच एका फोटोमध्ये हे कपल वधूसोबत फोटो काढतानाही दिसत आहेत. लग्नासाठी वधूने जाड पांढरा रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

7/7

हे फोटो शेअर करताना झहीर इक्बालने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'माझ्या बहिणीचे लग्न आहे...' यासोबतच अभिनेत्याने हार्ट इमोजी देखील बनवला आहे.