World Strange Laws : प्रसूतीदरम्यान कितीही वेदना झाल्या तरी महिलांनी चकार शब्द काढू नये, नाहीतर...

जगातील प्रत्येक राष्ट्राकडून आपआपल्या देशातील नागरिकांसाठी काही असे नियम आखले जातात ज्यांचं पालन नागरिकांना करावंच लागतं. काही देशांतील नियम प्रशंसनीय असतात. पण, काही नियम मात्र भुवया उंचावणारे असतात. प्रवास म्हणू नका, परदेशी नागरिक म्हणू नका किंवा मग सार्वजनिक ठिकाणी वावरणं म्हणू नका. प्रत्येक गोष्टीवर असे काही निर्बंध जगभरात आहेत की ते पाहून इथं माणसं जगतात कशी हाच प्रश्न तुम्हाला पडेल. 

Dec 14, 2022, 14:12 PM IST

World Strange Laws : जगातील प्रत्येक राष्ट्राकडून आपआपल्या देशातील नागरिकांसाठी काही असे नियम आखले जातात ज्यांचं पालन नागरिकांना करावंच लागतं. काही देशांतील नियम प्रशंसनीय असतात. पण, काही नियम मात्र भुवया उंचावणारे असतात. प्रवास म्हणू नका, परदेशी नागरिक म्हणू नका किंवा मग सार्वजनिक ठिकाणी वावरणं म्हणू नका. प्रत्येक गोष्टीवर असे काही निर्बंध जगभरात आहेत की ते पाहून इथं माणसं जगतात कशी हाच प्रश्न तुम्हाला पडेल. 

1/8

Strangest and Surprising laws around the world

तुमचा विश्वास बसणार नाही, पण नायजेरियामध्ये महिलांना प्रसूत कळांमुळे प्रचंड वेदना होत असल्या तरीही त्या मूक गिळून सहन कराव्या लागतात. त्यांना रडण्यासही मनाई असते. (nigeria)

2/8

Strangest and Surprising laws around the world

व्हर्जिनियामध्ये सार्वजनिक ठिकाणांवर अपशब्दांचा वापर वर्ज्य आहे. या नियमाचं पालन न केल्यास तुमच्यावर दंडात्मक कारवाई होते. (verginia)

3/8

Strangest and Surprising laws around the world

जपानमध्ये ओवर इटिंग म्हणजेच आपल्या क्षमतेहून जास्त खाण्यापिण्यावर बंदी आहे. तुम्ही जर अन्न वाया घालवताय तर हा धोक्याचा इशारा असू शकतो. (Japan)  

4/8

Strangest and Surprising laws around the world

ऐतिहासिक वारसा असणाऱ्या ग्रीसमध्ये सार्वजनिक ठिकाणांवर कपडे काढण्यास बंदी आहे. परदेशी पर्यटक किंवा स्थानिक नागरिक कुणीही हा नियम मोडल्यास त्यांना कारावास होऊ शकतो. (greece)  

5/8

Strangest and Surprising laws around the world

कबुतर, हा पक्षी तुम्हाला अडचणीत आणू शकतो. कारण ऑस्ट्रेलियामध्ये होमिंग प्रजातीचं कबुतर पकडल्यास तुम्हाला कारावास किंवा 20 हजार रुपये इतका दंड भरण्याची शिक्षा होऊ शकते. (australia)

6/8

Strangest and Surprising laws around the world

स्वित्झर्लंडमध्ये तर कहरच आहे, कारण इथे रात्री 10 वाजल्यानंतर टॉयलेटमध्ये फ्लश करण्यास मनाई आहे. इथं काही परिसरांमध्ये हा नियम लागू आहे. (Switzerland)

7/8

Strangest and Surprising laws around the world

तुम्ही कधी थायलंडमध्ये गेलात तर चुकूनही तिथं पडलेल्या पैशांवर पाय ठेवू नका. राजेशाही असणाऱ्या या देशाच्या चलनांवर राजाचा फोटो आहे. त्यामुळं चलनावर चुकूनही पाय ठेवल्यास तो अपमान ग्राह्य धरला जातो. (thailand)

8/8

Strangest and Surprising laws around the world

वाळवंटीय भागात तुम्हाला बहुतांश ठिकाणी निवडुंग दिसेल. पण, अमेरिकेच्या अॅरिझोनामध्ये तुम्ही चुकूनही निवडुंग कापलं तर, तुम्हाला आजीवन कारावास आणि दंडात्मक कारवाईचा सामना करावा लागू शकतो. (America arizona)