'वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर...', सुरेश रैनाने दिला 'या' दोन खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याचा सल्ला

T20 World Cup 2024 : टीम इंडियाचे खेळाडू आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपासाठी जोरदार तयारी करत असल्याचं पहायला मिळतंय. सर्व खेळाडू अमेरिकेत पोहोचले असून रोहित शर्मा प्लॅनिंग करण्यात व्यस्थ झालाय. अशातच आता सुरेश रैनाने कॅप्टन रोहित शर्माला महत्त्वाचा सल्ला दिलाय.

| May 31, 2024, 18:54 PM IST
1/7

आक्रमक खेळाडू

टीम इंडियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकायचा असेल तर आक्रमक फलंदाजी करणाऱ्या खेळाडूंना संघात दिलं गेलं पाहिजे, असं सुरेश रैना म्हणतो.

2/7

विजय मिळवायचा असेल तर...

अमेरिका आणि वेस्ट इंडिजमधील खेळपट्ट्यावर विजय मिळवायचा असेल तर दोन असे खेळाडू आहेत, ज्यांना नक्कीच प्रत्येक सामना खेळाला लागेल, असंही रैना म्हणतो.

3/7

यशस्वी जयस्वाल आणि शिवम दुबे

सलामीवीर यशस्वी जयस्वाल आणि ऑलराऊंडर शिवम दुबे या दोघांनाही प्लेईंग 11 मध्ये संधी द्यायला हवी, असं स्पष्ट मत सुरेश रैनाने व्यक्त केलंय.

4/7

विराट कोहली

अमेरिकेच्या संथ खेळपट्टीवर विराट कोहलीची भूमिकाही महत्वाची ठरणार आहे. विराट कोहलीला तिसऱ्या क्रमांकावरच खेळवायला हवं, असंही रैनाने यावेळी म्हटलंय.

5/7

संथ खेळपट्ट्या

अमेरिकेतील खेळपट्ट्या संथ असल्याने तुम्हाला असे फलंदाज देखील हवे असतील जे चोरटया धावा घेतील. त्यामुळे तुमच्या गोलंदाजांना पुढील काम सोपं जाईल, असंही रैना म्हणतो.

6/7

शिवम दुबे

युवराज सिंह आणि एमएस धोनीसारखी पॉवर हिटिंग क्षमता शिवम दुबेकडे आहे, त्यामुळे तो नक्की टीम इंडियाचा हुकमी एक्का ठरू शकतो, असा विश्वास देखील रैनाने दाखवला आहे.

7/7

कोच आणि कॅप्टन

दरम्यान, रोहित शर्माला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची? यावर कोच आणि कॅप्टनला विचार करावा लागेल, असं म्हणत रैनाने चेंडू रोहितच्या पारड्यात टाकला आहे.