बटाट्याचा वापर करुन चांदीची भांडी नव्यासारखी चमकवा, कसं ते जाणून घ्या

बटाट्याचा वापर तुम्ही साफ-सफाईसाठीही करु शकता. कसे ते जाणून घ्या या फोटोगॅलरीच्या माध्यमातून 

| Jun 12, 2023, 19:27 PM IST

बटाट्याचा वापर तुम्ही साफ-सफाईसाठीही करु शकता. कसे ते जाणून घ्या या फोटोगॅलरीच्या माध्यमातून 

1/5

बटाट्याचा वापर करुन चांदीची भांडी नव्यासारखी चमकवा, कसं ते जाणून घ्या

Surprising Things You Can Clean with a Potato

बटाट्यापासून बनवलेले सर्व पदार्थ अगदी लहानमुलांपासून म्हातारे आजी-आजोबाही आवडीने खातात. प्रत्येक भाजीत हमखास बटाटा आढळतो. सगळ्या भाजीत मिसळून जाणाऱ्या बटाट्याचा वापर तुम्ही क्लिनिंगमध्येही करु शकतात. कॉमन व्हेजिटेबल असलेल्या बटाट्याचा वापर करुन तुम्ही घरातील कोणत्या-कोणत्या वस्तू साफ करु शकता यावर टाकलेली एक नजर

2/5

चांदीचे दागिने

 Surprising Things You Can Clean with a Potato

चांदीचे दागिने बरेच दिवस कपाटात ठेवल्यावर ते हळहळू काळे पडण्यास सुरुवात होते. चांदीच्या दागिन्यांची चमक पुन्हा आणण्यासाठी बटाटा बारीक चिरुन उकळत्या पाण्यात टाका. पाणी उकळल्यावर त्यात चांदीचे दागिने एक तास ठेवून द्या. नंतर ब्रशच्या सहाय्याने ते साफ करा. 

3/5

चश्मा

Surprising Things You Can Clean with a Potato

मास्क लावल्यावर हमखास चश्मावर वाफ जमा होते. त्यामुळं सतत चश्मा पुसावा लागतो. त्यामुळं अनेकांची चिडचिड होते. यावर उपाय म्हणजे बटाटा कापून तो चश्माच्या आतील भागातील काचेवर रगडा. यामुळं तिथे पुन्हा वाफ जमा होणार नाही

4/5

सुरी

Surprising Things You Can Clean with a Potato

किचनमध्ये वापरात येणाऱ्या सुरीला गंज लागल्यावर त्याची धार कमी होते व त्याची चमकही फिकी पडते. त्यासाठी बटाट्यावर डिश वॉशिंग लिक्विड आणि बेकिंग पावडर टाकून ते सुरीवर जिथे गंज लागला आहे त्याठिकाणी रगडा. त्यानंतर पाण्याने सुरी धवून घ्या

5/5

चेहऱ्यावरील काळे डाग

Surprising Things You Can Clean with a Potato

चेहऱ्यावर पिंपल्स आल्यावर अनेकदा काळे डाग तसेच राहतात. अशावेळी बटाट्याचा तुकडा काळ्या डागांवर फिरवा. जवळपास एक आठवड्यापर्यंत हा उपाय करा. बटाट्यामुळं तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग नाहीसे होतील