Swapnil Joshi नं दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेण्यापूर्वी पत्नीसमोर ठेवली अशी अट, मग...
आम्ही तुम्हाला स्वप्नील आणि लीना एकमेकांच्या प्रेमात कसे पडले हे सांगणार आहोत.
Swapnil Joshi : मराठी इंडस्ट्रीत चॉकलेट बॉय म्हणून ओळख निर्माण करणारा स्वप्नील जोशी. स्वप्नील जोशीने त्याच्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकले आहे. स्वप्नील ने अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. रामानंद सागर यांच्या 'श्री कृष्णा' या मालिकेत भगवान कृष्णाची या भूमिकेमुळे घरोघरी पोहचला.
1/4
2/4
स्वप्नील जोशीची लव्ह लाईफ चढ-उतारांनी भरलेली होती. त्याने दोनदा लग्न केले. स्वप्नीलचे पहिले लग्न अपर्णा जोशीसोबत झाले होते. खरं तर, स्वप्नील 11वीत असताना पहिल्यांदा प्रेमात पडला होता. त्यादरम्यान त्यांची अपर्णासोबत भेट झाली. दोघांची मैत्री झाली आणि या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघेही बराच काळ एकमेकांना डेट करत होते. यानंतर 2005 मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र, हे लग्न फार काळ टिकले नाही. लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही वेगळे झाले.
3/4
स्वप्नील त्याच्या आयुष्यात पुढे गेला आणि दोन वर्षांनी तो पुन्हा एकदा प्रेमात पडला. स्वप्नीलच्या आयुष्यात लीना आराध्याची एन्ट्री झाली. स्वप्नील आणि लीना यांची मुंबईत भेट झाली. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. स्वप्नीलने त्याच्या आणि लीनाच्या नात्याचा खुलासा मीडियासमोर केला. दोघांनी 2011 मध्ये महाराष्ट्रीयन रितीरिवाजाने लग्न केले. आता स्वप्नील आणि लीना एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत.
4/4