T20 World Cup : बापच तो... जग्गजेता झाल्यानंतरचं पहिलं सेलिब्रेशन मुलांबरोबरच; हे भावनिक फोटो पाहाच

भारतीय संघाने 13 वर्षानंतर पटकवली टी 20 वर्ल्ड कपची ट्रॉफी...

| Jul 06, 2024, 17:53 PM IST

भारताने तब्बल 13 वर्षानंतर टी 20 वर्ल्ड कप जिंकला आहे. रोहित शर्मा आणि त्याच्या टीमसाठी हा खास क्षण होता. अगदी अटीतटीचा सामना झाल्यानंतर सूर्यकुमारने घेतलेल्या 'त्या' कॅचने सामना फिरला. विजयासाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय संघाच्या पदरी 13 वर्षांनी हा विजय पडला. यानंतर कॅप्टन रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यासारखे खेळाडू हा क्षण पत्नी आणि मुलांसोबत घालवताना दिसले. पाहा या क्षणाचे खास फोटो. 

1/8

साऊथ आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात 7 धावांनी विजय मिळवून टी 20 वर्ल्ड कपचा इतिहास भारतीय संघाने मिळवला. यावेळी बॅट्समनसोबतच बॉलरने देखील कमाल केली. या सामन्यात जसप्रित बुमराहने 'प्लेअर ऑफ द सीरीज' हा किताब पटकावला.  

2/8

विराट कोहलीने 76 धावापूर्ण करून साऊथ आफ्रिकेच्या संघासमोर आव्हान ठेवलं. हा सामना जिंकला नंतर टी 20 मधून आपण सेवानिवृत्ती घेत असल्याचं विराट कोहलीने यावेळी सांगितलं. 

3/8

भारतीय चाहते टी 20 वर्ल्ड कपच्या विजयाचा आनंद साजरा करतच होते. त्यावेळी विराट कोहलीने आपला हा शेवटचा वर्ल्ड कप असल्याचं सांगितलं. चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. 

4/8

विराट कोहली कायमच आपल्या कुटुंबाशी किती जोडला आहे याची कल्पना आपल्याला आहे. काल जबरदस्त खेळ मैदानात दाखवल्यानंतर विराट कोहलीने आपल्या विजयाचा आनंद पत्नी अनुष्का,मुलगी वामिका आणि मुलगा अकायसोबत शेअर केला. 

5/8

तब्बल 13 वर्षांनंतर भारतीय संघाने टी 20 वर्ल्ड कप पटकावला आहे. रोहित शर्माने हा आनंद लेकीसोबत मैदानात साजरा केला. मुलीला खांद्यावर घेऊन संपूर्ण मैदानात 

6/8

रोहितसाठी खास क्षण

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यावेळी मैदानाताच भावूक होताना दिसला. रोहित शर्माने पत्नीला मिठी मारून व्यक्त केल्या भावना. 

7/8

भारताच्या टी 20 वर्ल्ड कप विजयामध्ये बुमराह महत्त्वाचा खेळाडू ठरला. जसप्रित बुमराहने आपला मुलगा अंगद आणि पत्नी संजनासोबत साजरा केला हा आनंद. कुटुंबासोबतचे खास क्षण. 

8/8

आनंदाश्रू

कॅप्टन पदावरुन वाद, ट्रोलिंग, घटस्फोट या सगळ्या चर्चांनंतर टी 20 वर्ल्ड कपच्या विजयानंतर हार्दिक पांड्या ढसाढसा रडला. हार्दिक पांड्याने प्रेशरमध्ये स्वतःला शांत ठेवून सामना भारताकडे खेचून आणला.