T20 WC Semi-Final सेमीफायनलपूर्वी मृत्यूच्या दाढेतून परतली इंग्लंडची टीम

महिला टी-20 वर्ल्डकप सुरु असून इंग्लंडची टीम शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेमीफायनल खेळली. मात्र त्यापूर्वी पण इंग्लंडच्या टीम अगदी मृत्यूला सामोरी जाऊन आली, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

Feb 24, 2023, 21:15 PM IST
1/5

इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या दोन्ही टीमने सेमीफायनलसाठी जोरदार तयारी केली. मात्र, या सेमीफायनलपूर्वी इंग्लंड टीमसोबत एक मोठी घटना घडली.

2/5

दरम्यान खेळाडूंच्या मनात अजूनही याचा धाक आहे. इंग्लंडची खेळाडू डॅनियल व्याटने या भयानक क्षणाचा खुलासा केलाय.

3/5

इंग्लंडची संपूर्ण टीम केपटाऊनमधील डोंगराळ भागात फिरण्यासाठी गेली असताना तिथे त्यांनी रोपवेचा आनंद घेतला. पण बोगी डोंगराळ भागात मध्यावर असताना अचानक बंद पडली आणि अडकली.

4/5

लोड शेडिंगमुळे असा प्रकार घडल्याचं समोर आलंय. इंग्लंडची डॅनियले व्याटने धक्कादायक अनुभव नुकताच शेअर केलाय.

5/5

मी रोपवेनं यापुढे कधीच जाणार नाही. त्यापेक्षा मी पुढच्या वेळेस पायऱ्यांनी जाणं पसंत करेन, असं व्याटने म्हटलं