लोकल ट्रेन पकडा आणि थेट धबधब्यावर पोहचा; मुंबईजवळचे मॉन्सून स्पेशल स्पॉट

मुंबईच्या जवळ असलेले धबधबे. मुबई लोकल ट्रेन पकडून तुम्ही या धबधब्यांवर जाऊ असता. एका दिवसात तुम्ही येथे फिरुन रिटर्न देखील येऊ शकता. 

| Jun 10, 2024, 22:13 PM IST

Best Monsoon Waterfalls Near Mumbai : उंच डोंगरावरून कोसळणारे धबधबे... नागमोडी रस्ते... हिरव्यागार डोंगर रांगा. मुंबईकरांना नेहमीच याचे आकर्षण असते. पावासाळा सुरु झाला की पावले धबधब्यांकडे वळू लागतात. कामात व्यस्त असणाऱ्या मुंबईकरांना मोठी सुट्टी घेणे शक्य होत नाही. अशा वेळेत मुंबईच्या अगदी जवळ असलेल्या या धबधब्यांना भेट देऊ शकता. या धबधब्यांवर लोकल ट्रने पकडूनही जाता येईल. one day picnic साठी हे धबधबे एकदम परफेक्ट पिकनिक स्पॉट आहेत. 

1/10

कान्हेरी

बोरीवली येथील नॅशनल पार्कमधील कान्हेरी गुंफा येथे असलेला धबधबा देखील चांगलाच लोकप्रिय आहे. 

2/10

झेनीथ

खोपोलीतील झेनीथ वॉटरफॉल देखील खूपच लोकप्रिय आहे. खोपोली स्थानकातून येथे जाता येते. 

3/10

टपालवाडी

नेरळ रेल्वे स्थानकात उतरुन टपालवाडी  धबधव्यावर जाता येते.

4/10

आनंदवाडी

नेरळ रेल्वे स्थानकात उतरुन आनंदवाडी धबधव्यावर जाता येते.

5/10

भिवपुरी

भिवपुरी धबधबा देखील चांगलाच लोकप्रिय आहे. खोपोलो किंवा कर्जत ट्रेन पकडून भिवपुरी रेल्वे स्थानकात उतरुन येथे जाता येते. 

6/10

पळसदरी

पळसदरी धबधबा मध्य रेल्वे मार्गावर आहे. 

7/10

कोंडेश्वर

कोंडेश्वर हा बदलापूरमधील प्रसिद्ध धबधबा आहे.  

8/10

गावदेवी

गावदेवी धबधबा नवी मुंबईत आहे. एरोली रेल्वे स्थनाकातून येथे जाता येते. 

9/10

पांडवकडा

पांडवकडा धबधबा नवी मुंबईत आहे. खारघर रेल्वे स्थानकातून येथे जाता येते. 

10/10

तुंगारेश्वर

 तुंगारेश्वर धबधबा हा वसईत आहे. वसई स्टेशनवरुन अगदी जवळ आहे.