Independence Day : हे खरंय! स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरु असणाऱ्या 'या' कंपन्या आज करताहेत कोट्यवधींची उलाढाल

आज आम्ही तुम्हाला अशा काही कंपन्यांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी झाली आहे. आजही या कंपन्या जगभरात यशस्वीपणे कार्यरत आहेत.

Aug 09, 2022, 16:24 PM IST

यंदाच्या 15 ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पुर्ण होत आहेत. संपूर्ण देशामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जातोय. यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला अशा काही कंपन्यांबद्दल माहिती सांगणार आहोत ज्यांची स्थापना देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी झाली आहे. आजही या कंपन्या जगभरात यशस्वीपणे कार्यरत आहेत.

1/7

 देशाला स्वातंत्र्य मिळण्याआधी सुरु झालेल्या कंपन्यांमध्ये सर्वात पहिलं नाव म्हणजे टाटा ग्रुप. टाटा ग्रुपची सुरुवात 1868 साली जमशेदजी टाटांनी केली होती. आज ही कंपनी आयटी सेक्टर, मेटल सेक्टर, ऑटो सेक्टरच्या व्यतिरिक्त अनेक क्षेत्रात कार्यरत आहे. टाटा कंपनीने 27 जानेवारीला एअर इंडियाची (Air India) मालकी विकत घेतली आहे.   

2/7

 फूड सेक्टरमध्ये सर्वात नामांकित असलेली कंपनी म्हणजे ब्रिटानिया ग्रुप (Britannia Group). या कंपनीची स्थापना वाडिया कुटूंबीयांनी कोलकत्तामध्ये 1892 साली केली. 11878 कोटी रुपयांचा रेव्हेन्यू असलेल्या या कंपनीचं कार्यक्षेत्र हे जगभरात पसरलेलं आहे.

3/7

अर्देशिर गोदरेज आणि फीरोजशा गोदरेज (Ardeshir Godrej, Pirojsha Burjorji Godrej) यांनी 1897 ला गोदरेज समुहीची (Godrej Group) स्थापना केली होती.

4/7

 बिर्ला ग्रुपची (Birla Group) स्थापना 1857 ला घनश्याम दास बिर्ला (GD Birla) यांचे आजोबा सेठ शिव नारायण यांनी केली होती. आज या ग्रुपचे चेअरमन मंगलम बिर्ला हे आहेत. या ग्रुपचा कारभार जवळ-जवळ 36 देशांमध्ये पसरलेला आहे.

5/7

दुचाकी वाहनांची निर्मिती करणाऱ्या कंपनीमध्ये सर्वात टॉपमध्ये नाव येतं ते टीव्हीएस ग्रुपचं (TVS Group). या ग्रुपची स्थापना 1911 साली टीव्ही सुंदरम अयंगर यांनी केली होती. या कंपनीचं मुख्यालय हे चेन्नईला आहे.

6/7

 डॉक्टर एसके बर्मन यांनी 1884 साली डाबर (Dabur) कंपनीची सुरुवात केली होती. आज या कंपनीचा टर्नओवर 1 हजार कोटींपेक्षा जास्त आहे.

7/7

कपड्यांच्या मार्केटमध्ये सर्वात नामांकित असलेली कंपनी म्हणून ज्याची ओळख आहे ती म्हणजे रेमंड (Raymond) कंपनी.  या कंपनीची सुरुवात 1925 साली विजयपत सिंघानिया यांनी केली. त्याचबरोबर,  1958 साली या कंपनीचा पहिला रिटेल शोरुम मुंबईमध्ये सुरु झालं होतं.