Tata : मिठापासून लष्कराच्या विमानांपर्यंत, प्रत्येकाच्या घरात TATA चं एकतरी प्रोडक्ट असेलच
Tata Group Brands : बॉटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड बिसरेली (Bisleri) आता टाटा समुहाने (Tata Group) येणार आहे. त्यामुळे टाटा समूह खूप मोठा ब्रँड झाला आहे. टाटा समूह कुठल्या क्षेत्रात नाही असं म्हटलं तर वावग ठरणार नाही.
How Big is Tata Group : आज प्रत्येकाच्या घरात टाटा ग्रुपचं काही काही सापडतं. तुम्ही घराबाहेर पडलात, वाळवंटात असो किंवा डोंगरदऱ्यात तुमच्या अवती भवती टाटाचं काही ना काही नक्कीच दिसतं. टाटा नमक, टाटाची कार, चहा असो किंवा ट्रक अगदी तुमच्या घरात येणारी वीज देखील...टाटा समूह देशात आणि जगात 10 क्लस्टरमध्ये 30 कंपन्यांसह कार्यरत आहे. त्याचा व्यवसाय 100 हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. आता बॉटलीबंद पाण्यातला सर्वात मोठा ब्रँड बिसरेली (Bisleri) आता टाटा समुहाने (Tata Group) घेणार आहे. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला आहे की, टाटा समूह कशा कशात काम करतं ते.