गुळाचा चहा करताना दूध फाटतं? मग हा उपाय करुन पाहा

हल्ली साखरेऐवजी गुळाचा चहा पिण्याचे प्रमाण वाढले आहे. पण गुळाचा चहा करताना दुध फाटतं असा अनुभव अनेकांना येतो. अशावेळी हा एक उपाय करुन पाहा. 

| Nov 28, 2024, 14:15 PM IST

हल्ली साखरेऐवजी गुळाचा चहा पिण्याचे प्रमाण वाढले आहे. पण गुळाचा चहा करताना दुध फाटतं असा अनुभव अनेकांना येतो. अशावेळी हा एक उपाय करुन पाहा. 

1/7

गुळाचा चहा करताना दूध फाटतं? मग हा उपाय करुन पाहा

Tea Recipe in marathi How to make jaggery tea with milk

 हल्ली मधुमेहाचे रुग्ण साखर खाण्याचे टाळतात. मग साखरेला पर्याय म्हणजे गुळ. हल्ली अनेक मोठ्या हॉटेलमध्येही गुळाचा चहा केला जातो. मात्र घरी गुळाचा चहा करताना दूध फाटतं? अशावेळी काय करायचं जाणून घ्या.

2/7

गुळामुळं चहातील दूध फाटते. दूध फाटल्यावर चहावर पांढरा थर दिसू लागतो. त्यामुळं चहाची चव बिघडते व अॅसिडीटीचा त्रास वाढण्याची शक्यता असते. 

3/7

 गुळाचा चहा करताना दूध फाटू नये यासाठी काय कराता येईल, हे  जाणून घ्या. 

4/7

गुळाचा चहा कसा करावा?

पाणी- 1 कप, चहा पावडर, वेलची पूड, जायफळ पूड, दूध, गुळ- 1 टेबलस्पून

5/7

कृती

गुळाचा चहा करताना सगळ्यात आधी एका भांड्यात पाणी उकळवायला ठेवा. नंतर त्यात चहा पावडर, वेलची पूड आणि जायफळ पूड घालून मिश्रण हलके ढवळून घ्या.

6/7

 चहाला उकळी आल्यानंतर गॅस थोडा कमी करुन त्यात दूध घालावे. नंतर आणखी एक उकळी येवून द्यावी. चहाला उकळी आल्यानंतर गॅस बंद करुन त्यात किसलेला गुळ किंवा गुळाची पावडर टाकून चहा थोडा उकळून घ्यावा. 

7/7

चहामध्ये गुळ टाकताना गॅस बंद करुनच घालावा. दूध उकळण्यापूर्वी चहात गूळ किंवा गुळाची पावडर घातली तर चहा खराब होऊ शकतो.