Virat Kohli : विराट कोहलीचं कार कलेक्शन पाहिलत का? प्रत्येक कार करोडोत... पाहा फोटो

Virat Kohli Favorite Cars: भारतीय क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) मैदानावर जितका आक्रमक असतो तितकाच तो स्टाईलच्या बाबतीतही एक पाऊल पुढे असतो. कोहलीच्या फलंदाजीचे लाखो क्रिकेट चाहते (Virat Kohali Fans) आहेत. पण त्याचबरोबर तो स्टाईल आयकॉनही (Style Icone) आहे. त्याची हेअर स्टाईल, त्याचे कपडे यांची क्रेझही त्याच्या चाहत्यांमध्ये असते. विराट कोहलीला महागड्या कारचाही छंद आहे. त्याच्याकडे अनेक महागड्या ब्रँडच्या कार आहेत. आपण एक नजर टाकूया त्याच्या कार कलेक्शनवर (Car Collection).

| May 05, 2023, 17:07 PM IST
1/5

विराटच्या कार कलेक्शनमध्ये त्याची सर्वात आवडती कार आहे  बेंटले कॉन्टिनेंटल जीटी ही लक्झरी कार. या कारची किंमत जवळपास 4.04 कोटी रुपये आहे. 

2/5

या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे बेंटले कंपनीचीच फ्लाइंग स्पर ही लक्झरी कार. या कारची किंमत 3.41 कोटी रुपये इतकी आहे. 

3/5

विराटच्या आणखी एक आवडती कार म्हणजे ऑडी. विराटकडे ऑडी आर8 एलएमएक्स ही लिमिटेड एडिशनची कार आहे. या अलिशान कारची किंमत 2.97 कोटी रुपये आहे. 

4/5

कार कलेक्शनमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे ऑडी कंपनीचीच आर8 वी10 ही महागडी कार. या कारमची किंमतही कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. ऑन रोड या कारची किंमत 2 कोटी रुपये आहे. 

5/5

कोहलीकडे पाचवी कार आहे ऑडी ए8 डब्ल्यू12 क्वात्त्रो, या कारची किंमत जवळपास 1.87 कोटी रुपये किंमत आहे.