साऊथचा 'हा' खतरनाक हॉरर थ्रिलर चित्रपट आहे नंबर 1! पाहून उडेल तुमचा थरकाप; रेटिंग 7.9

Best Horror Thriller Film: या चित्रपटाच्या कथेत अशी काही दृश्य आहेत जी दिसायला इतकी भयानक आहेत की ती पाहिल्यानंतर तुम्हाला उलटी देखील होऊ शकते.

| Jan 20, 2025, 12:16 PM IST

Best Horror Thriller Film: या चित्रपटाच्या कथेत अशी काही दृश्य आहेत जी दिसायला इतकी भयानक आहेत की ती पाहिल्यानंतर तुम्हाला उलटी देखील होऊ शकते.

1/7

Best Horror Thriller Film: काही चित्रपट असे असतात जे तुमच्या हृदयावर आणि मनावर अशी छाप सोडतात की त्या चित्रपटातील सीन्स काही केल्या डोक्यातून जात नाहीत. आज आम्ही तुम्हाला एका हॉरर थ्रिलर चित्रपटाबद्दल सांगणार आहोत जो पाहिल्यानंतर तुमचा थरकाप उडेल. 

2/7

तुमची झोप उडेल

हा सिनेमा असा आहे ज्याला पाहून तुमची झोप उडेल. या चित्रपटाची कथा भीतीच्या छायेत असलेल्या गावाची आहे. जिथे लोक सतत मरत आहेत आणि कोणतीतरी अज्ञात शक्ती त्या मृत्यूंना कारणीभूत आहे.

3/7

दक्षिणेतील सर्वात भयानक चित्रपट

1 तास 56 मिनिटांच्या या चित्रपटाच्या कथेत अशी काही दृश्य आहेत जी दिसायला इतकी भयानक आहेत की ती पाहिल्यानंतर तुम्हाला उलटी देखील होऊ शकते. ही दृश्य तुम्हाला आतून हलवून सोडेल. यावरून हा चित्रपट किती भयानक असेल याची कल्पना येऊ शकते.  

4/7

कोणता आहे सिनेमा?

  या भितीदायक चित्रपटाचे नाव आहे 'कलिंगा'. या 'कलिंगा' चित्रपटाची कथा एका गावाची आहे. चित्रपटाची सुरुवात एका शेतकऱ्यापासून होते. जो आपल्या शेतात काम करून शेताच्या मध्यभागी बांधलेल्या झोपडीत परततो. त्याची पत्नी जेवण देत असताना तिला कोणाचा तरी आवाज येतो.

5/7

त्या अज्ञात शक्तीची भीती

ती बाहेर पडताच ती परत येत नाही. तेव्हा तिचा नवरा म्हणतो की, मी काही ऐकले नाही, मग माझी पत्नी कुठे गेली? यानंतर तो बाहेर येतो आणि काही अंतरावर जाऊन त्याला दिसते की त्याची पत्नी नरभक्षक झाली आहे. यानंतर कथा पुढे सरकते. या कथेत असे ट्विस्ट आणि टर्न्स आहेत ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही.

6/7

कोण आहेत कलाकार?

या तेलगू चित्रपटात ध्रुव वायु मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात त्यांनी लिंगमची भूमिका साकारली आहे. त्याच्या पत्नीचे नाव पद्दू आहे. ही कथा लिंगमभोवती फिरते. विशेष म्हणजे ध्रुवनेच या चित्रपटात फक्त मुख्य भूमिका केली नसून तो स्वत: चित्रपटाचा दिग्दर्शकही आहे.

7/7

कलिंगाचे रेटिंग

  हा चित्रपट 2024 मध्ये प्रदर्शित झाला होता. या हॉरर चित्रपटाला IMDB वर 7.9 रेटिंग मिळाले आहे. त्याच वेळी, तुम्ही हा चित्रपट OTT प्लॅटफॉर्म प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.