ठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गासंदर्भात महत्वाची अपडेट

Thane To Borivali Underground Subway:बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. 

| Oct 20, 2023, 17:55 PM IST

Thane To Borivali Underground Subway:या प्रकल्पासाठी महत्त्वाची असलेली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी प्राप्त आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री शएकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 22 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

1/13

ठाणे- बोरिवली प्रवासात 1 तासाचा वेळ वाचणार; भुयारी मार्गाला मिळाली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

Thane and Borivali twin Tunnel Project: मुंबई महानगर प्रदेशातील दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडून वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्वाकांक्षी प्रकल्प एमएमआरडीएने हाती घेतला आहे. त्यानुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान भूमिगत भुयारी मार्गाच्या सहाय्याने ठाणे आणि बोरिवली दरम्यानचे अंतर कमी होणार आहे. ज्यामुळे या भागातील प्रवासाच्या वेळेत सुमारे 1 तासांची बचत होणार आहे. 

2/13

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

या प्रकल्पासाठी महत्त्वाची असलेली राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी प्राप्त आहे. महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री शएकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या 22 व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 

3/13

प्रकल्प कसा असेल?

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

मुंबई जिल्ह्याच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली  आणि ठाणे जिल्ह्याला भूमिगत मार्गाने जोडणाऱ्या प्रकल्पाच्या व्याप्तीमध्ये 10.25 किमीचा बोगदा आणि 1.55 किमीचा पोहचमार्ग असा 13.5 मीटर अंतर्गत व्यासासह सुमारे 12 किमी लांबीचा दुहेरी भूमिगत बोगदा असणार आहे. 

4/13

आपत्कालीन मार्ग

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

या बोगद्याच्या दोन्ही बाजूस 2+2 मार्गिकांसह आपत्कालीन मार्ग देखील असणार आहे. प्रत्येक 300 मीटरवर पादचारी क्रॉस पॅसेज आणि प्रत्येक 2 पादचारी क्रॉस पॅसेजनंतर वाहन क्रॉस पॅसेजची तरतूद आहे. 

5/13

चार टनल बोरिंग मशिन

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

प्रकल्पातील बोगद्यांचे बांधकाम हे आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आणि चार टनल बोरिंग मशिनच्या मदतीने करण्यात येणार आहे. सुमारे 12 किमी लांबीच्या प्रकल्पातील 4.43 किमी लांबीचा ही ठाणे जिल्ह्यातून तर 7.4 किमी लांबी ही बोरीवलीमधून प्रस्तावित आहे.

6/13

वायुविजन प्रणाली

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

प्रकल्पातील या बोगद्यांमध्ये अग्निशामक यंत्रे, पाण्याची नाळी, स्मोक डिटेक्टर, एलईडी लाईटचे संकेत फलक लावले जातील.  तसेच NFPA502 च्या तरतुदींनुसार बोगद्यात नैसर्गिक किंवा यांत्रिक मार्गाने पुरेशी वायुविजन प्रणाली देखील उभारली जाणार आहे. 

7/13

एकूण 3 पॅकेजेस मध्ये विभागला

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

प्रकल्पाची किंमत ही सुमारे रुपये 16 हजार 600 कोटी इतकी असून त्यामध्ये जमीन अधिग्रहणाच्या खर्चाचा ही समावेश आहे. प्रकल्पाची व्याप्ती आणि चॅलेंजस पाहता हा प्रकल्प हा 2 स्थापत्य आणि 1 पॅकेज सुनियोजित वाहतूक प्रणाली संबंधित कामे अशा एकूण 3 पॅकेजेस मध्ये विभागला गेला आहे. 

8/13

प्रकल्पाचे फायदे

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

मुंबईच्या पश्चिम उपनगरातील बोरीवली आणि पूर्वेकडील ठाणे जिल्ह्याला जोडणारा सुमारे हा 12 किमीचा प्रकल्प संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणारा अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. ज्यामध्ये प्रदेशाची वाहतूक व्यवस्था सुधारून पर्यावरणीय स्थैर्य राखत नागरीकांचे जीवन आणखीन सुसह्य करण्याची क्षमता आहे. 

9/13

महत्त्वपूर्ण कॉरिडॉर

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

या प्रकल्पाच्या माध्यमातून पूर्व-पश्चिम लिंक रोड तयार होऊन राष्ट्रीय महामार्ग 3 आणि 8  मधील अवजड व्यावसायिक वाहतुकीसाठी एक महत्त्वपूर्ण कॉरिडॉर म्हणून कार्यरत राहील. सद्यःस्थितीत ठाणे ते बोरिवली दरम्यान घोडबंदर मार्ग 23 किमी अंतराच्या प्रवासासाठी सकाळी आणि संध्याकाळी वर्दळीच्या वेळी (peak hours) एक ते दोन तास आणि इतर वेळी किमान एक तास लागतो. 

10/13

पर्यावरणाचे संवर्धन

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत आणि इंधनाची लक्षणीयरीत्या  बचत होऊन तासांचा प्रवास काही मिनिटांत करता येणार आहे. ज्यामुळे सामान्य प्रवाशांना, अवजड वाहतुकीस आणि व्यवसायांना मोठा दिलासा मिळेलच पण कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे संवर्धन देखील होणार आहे. 

11/13

महत्त्वपूर्ण टप्पा साध्य

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

"एमएमआरडीएमार्फत उभारण्यात येणाऱ्या ठाणे - बोरीवली भूमिगत भुयारी मार्ग प्रकल्पासाठी राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाल्याने प्रकल्पाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा साध्य झाला आहे. 

12/13

रहदारीच्या आव्हानांवर उपाय

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

मुंबई आणि ठाणे सारख्या गजबजलेल्या शहरात भूमिगत बोगद्याचे बांधकाम हा सध्याच्या रहदारीच्या आव्हानांवर उपाय तर आहेच पण शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. 

13/13

पर्यावरण संरक्षणासह प्रगतीचा समतोल

Thane To Borivali Underground Subway in SGNP Marathi News

हा उपक्रम शहरी नियोजनाच्या दृष्टिकोणातून पर्यावरण संरक्षणासह प्रगतीचा समतोल साधण्यासाठी आणि भविष्यातील पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी एक मॉडेल म्हणून अधोरेखित होईल." असे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले.