बदलापुरमधील 51 वर्ष जुनं बारवी धरण! आता का होतेय येथे पर्यटकांची ऐवढी गर्दी

बदलापुरातील बारवी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. ठाणे जिल्ह्याची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. प्रथेप्रमाणे येथे जलपूजन संपन्न झाले.

Aug 07, 2023, 00:01 AM IST

Badlapur Barvi Dam : बदलापूरच्या बारवी धरणक्षेत्रात यावर्षी जुलै महिन्यात दमदार पाऊस झाल्यानं बारवी धरण ओव्हर फ्लो झालंय.  बारवी धरण पूर्ण भरल्यानंतर मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्यासह एमआयडीसीच्या 
अधिका-यांनी दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे बारवी धरणावर येऊन जलपूजन केलं. बारवी धरण ओव्हर फ्लो झाल्यामुळे येथे निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत. 

1/6

सध्या बारवी धरणाच्या 11 पैकी नऊ दरवाजातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.  बारवी धरणातून ठाणे, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरच्या औद्योगिक क्षेत्राला पाणीपुरवठा केला जातो.

2/6

बदलापुरमधील  बारवी धरण  51 वर्ष जुनं आहे. 1978 साली हे धरण बांधण्यात आले.  

3/6

अंबरनाथ तालुक्यात बदलापूर-मुरबाड रस्त्यावर निसर्गाच्या कुशीत वसलेल्या या बारवी धरणाच्या परिसारातून सुंदर नजारा पहायला मिळतो.

4/6

बारवी धरणाच्या आजूबाजूला झाडी आणि उंचच उंच हिरव्यागार टेकड्या आहेत. यामुळे अनेक जण येथे निसर्ग पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. 

5/6

अतिशय शांत आणि निसर्गरम्य ठिकाण अशी देखील बारवी धरण परिसराची ओळख आहे. मुंबईजवळचा हा एक बेस्ट पिकनिक स्पॉट देखील आहे. 

6/6

बारवी धरण पूर्ण भरल्यानंतर दरवर्षी येथे जलपूजन करण्याची प्रथा आहे.