महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ट्रेन प्रवास; आता सफर नाही केली तर 4 महिने पहावी लागेल वाट

नेरळ ते माथेरान असा टॉय ट्रेनचा प्रवास हा पर्यटकांसाठी अविस्मरणीय अनुभव असतो.

| May 28, 2024, 22:54 PM IST

Matheran Hill Station Trip : माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय हिल स्टेशन आहे. माथेरानचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना भारावून टाकते. नेरळ ते माथेरान ही टॉय ट्रेन देखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. महाराष्ट्रातील हा सर्वात सुंदर ट्रेन प्रवास. मात्र, वर्षातून 4 महिने टॉयट्रेनची सेवा बंद असते. काही दिवसांत ही सेवा बंद होणार आहे. यामुळे आत्ताच या सफरीचा अनुभव घ्या नाहीतर चार महिने वाट पाहावी लागेल. 

1/7

2/7

 माथेरान हे डोंगरात असल्याने येथे पावसाळ्याच दरड कोसळण्याच्या घटना घडतात. यामुळे पावसाळ्यात चार महिने टॉयट्रेनची सेवा पूर्णपणे बंद असते.   

3/7

मध्य रेल्वेने नेरळ स्टेशनला उतरुन टॉय ट्रेन किंवा शेअर टॅक्सीने माथेरानच्या गेटपर्यंत जाता येते. तिथून पुढे मात्र, पायीच संपूर्ण माथेरान फिरावे लागते. 

4/7

इको पॉईंट, सनसेट पाईंट, वन ट्री पॉईंट, मंकी पाईंट असे अनेक अप्रतिम व्ह्यू पॉइंट येथे आहेत. 

5/7

सर्वात सुंदर आणि आकर्षक असे हे हिल स्टेशन निसर्ग सौंदर्याने नटलेले आहे. हे समुद्रसपाटीपासून साधारणता 2600 फूट इतक्या उंचीवर आहे.   

6/7

डोंगराच्या कुशीत वसलेले माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात लहान हिल स्टेशन आहे. 

7/7

 माथेरानला मिनी महाबळेश्वर म्हणून देखील ओळखले जाते.