नवीन iPhone 15 मध्ये टायटेनियम बॉडी, खरंच मजबूत आहे का?

 iPhone 15 आणि iPhone 14 तुलना करत ग्राहकांनी review दिला आहे.  iPhone 15 ग्राहकांच्या अनेक तक्रारी आहेत. 

Sep 26, 2023, 15:32 PM IST

iPhone 15 Vs iPhone 14 : आयफोन- 15 सिरीज  12 सप्टेंबरला लाँच झाली. apple event मध्ये आयफोन- 15 सिरीज लाँच करण्यात आली.  iPhone 15 मध्ये देण्यात आलेली टायटेनियम बॉडी अत्यंत मजबूत  असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र, नवा iPhone 15 खरेदी केलेल्या ग्राहकांनी याचा review दिला आहे. ग्राहकांनी अनेक तक्रारी केल्या आहेत. iPhone 15 ने ग्राहकांची निराशा केली आहे. iPhone 15 पेक्षा iPhone 14 बेस्ट असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. 

1/7

12 सप्टेंबर रोजी बहुप्रतिक्षित आयफोन15 सीरिज अखेर लाँच झाली. अ‍ॅपलच्या वंडरलस्ट इव्हेंटमध्ये आयफोन15 सीरिजसह अनेक डिव्हाईसेस लाँच करण्यात आलेत.  

2/7

भारतात आयफोनची किंमत  79,900 रुपये आहे तर सर्वात महागडा प्रो-मॅक्स आयफोन- 15 हा 1 लाख 59 हजार 900 रुपयांचा आहे. 

3/7

iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max हे फोन लाँच केले आहेत. 

4/7

नव्या आयफोनमध्ये USB सी टाईप पद्धतीच्या चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. कोणत्याही सी टाईप चार्जिंग केबलने  आणि चार्जरने आयफोन चार्ज करता येवू शकतो. मात्र, चार्जिंग करताना फोन ओव्हरहीट होत असल्याचा ग्राहकांचा दावा आहे.

5/7

iPhone 14 मध्ये असलेली स्टील बॉडी  iPhone 15 मध्ये असलेल्या  टायटॅनियम बॉडी पेक्षा मजबूत आहे. एकाच वेळी  iPhone 15 आणि iPhone 14 ड्रॉप टेस्ट घेण्यात आली. यात iPhone 14 ला काहीही झालेले नाही.

6/7

टायटॅनियम बॉडी हेच iPhone 15 चं वैशिष्ट्य आहे. टायटेनियम बॉडी अत्यंत मजबूत  असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. मात्र, ड्रॉप टेस्टमध्ये कंपनीचा दावा फोल ठरला आहे. हा फोन पडल्यास यावर कॅमेरा तसेच स्करीनवर स्क्रॅच आल्याचा दावा काही ग्राहकांनी केला आहे. 

7/7

22 सप्टेंबरपासून भारतात अ‍ॅपलच्या आयफोन- 15 सिरीजची विक्री सुरु झाली. खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली आहे. मात्र, ज्या ग्राहकांनी  iPhone 15 खरेदी केलीा त्यांची निराशा झाली आहे.