रोमान्सच्या बाबतीत 'हा' देश आहे नंबर 1, नाव ऐकून बसेल धक्का

प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या गोष्टींमध्ये नंबर एक असतो. पण तुम्हाला माहिती आहे की, रोमान्सच्या बाबतीत कोणता देश एक नंबरवर आहे. जाणून घ्या सविस्तर

| Dec 27, 2024, 16:23 PM IST
1/7

रोमान्स

रोमान्सबाबत बोलायचे म्हटले तर कोणत्या देशात सर्वात हॉट कपल आहेत असा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर खूप वेगळं असेल. 

2/7

हॉट कपल

हॉट कपलच्या बाबतीत अनेक लोक इटालियन जोडपे असे उत्तर देतात. परंतु सध्या झालेल्या सर्वेक्षणात याच्या उलट उत्तर आले आहे.   

3/7

सर्वेक्षण

काही दिवसांपूर्वी सुट्टीच्या दिवशी रोमँटिक वेळ घालवलेल्या 2000 लोकांशी झालेल्या संभाषणांवर आधारित एक सर्वेक्षण करण्यात आले होते. 

4/7

इटालियन जोडपे

ज्यामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. कारण आतापर्यंत हॉट कपलच्या बाबतीत लोकांचे उत्तर इटालियन जोडपे होते. पण आता त्याची जागा ही ब्रिटिशांनी घेतली आहे. 

5/7

आश्चर्यकारक प्रियकर

इंग्लंडचे लव्ह बर्ड्स सर्वात उत्तम आहेत. येथील लोकांनी याबाबतीत इटलीसह सर्व देशांना मागे टाकले आहे. सर्वेक्षणात या जोडप्यांना 1 ते 10 यामध्ये जोडीदाराला किती रेटिंग द्याल. त्यावर रेटिंग 8 ते 10 दरम्यान होते. ज्यांना सर्वात आश्चर्यकारक प्रियकर ही पदवी देण्यात आली. 

6/7

ब्रिटीश

या सर्वेक्षणात ब्रिटीश 32 टक्के गुणांसह अव्वल स्थानावर तर फ्रेंच फक्त 11 टक्केवर आहेत. इटली 29 टक्क्यांसह दुसऱ्या तर 27 टक्क्यांसह अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर आहे. 

7/7

डेटिंग तज्ञ

डेटिंग तज्ञ सिल्विया लिंजालोन यांनी या सर्वेक्षणासंदर्भात सांगितले की, जगातील सर्वात आश्चर्यकारक प्रेमी इटली किंवा फ्रान्समध्ये नाही तर इंग्लंडमध्ये आढळतात.