महिना 17 लाखांचा मेकअप, नोकरांचा पगार 1000 कोटी, 365 खोल्यांचं घर अन्... राजासारखं जगतो 'हा' नेता

Leader Who Lives 365 Room Home1000 Crore Salary To Staff: राष्ट्राध्यक्षांना देशाचा प्रमुख नेते म्हणून पुरवल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा कोणत्याही राजापेक्षा कमी नसतात. जगभरामध्ये सामान्यपणे अमेरिकी राष्ट्राध्यक्षांना सर्वात शक्तीशाली समजलं जातं. मात्र या व्यतिरिक्त अन्य देशांच्या राष्ट्राध्यक्षांची श्रीमंती आणि आलिशान लाइफस्टाइल पाहून तुमचे डोळे नक्कीच पांढरे पडतील. अशाच एका आलिशान आयुष्य जगणाऱ्या राष्ट्राध्यक्षाबद्दल जाणून घेऊयात...

Swapnil Ghangale | Jan 06, 2024, 13:54 PM IST
1/12

emmanuel macron elysee palace

जगभरातील अनेक देशांमध्ये सर्वात शक्तीशाली पद हे राष्ट्राध्यक्षांचं असतं. संविधानातील विशेष अधिकारांबरोबरच राष्ट्राध्यक्ष हे त्यांच्या आलिशान लाइफस्टाइलसाठीही ओळकले जातात. 

2/12

emmanuel macron elysee palace

आपण आज अशा राष्ट्राध्यक्षांबद्दल जाणून घेणार आहोत जे एका महलात राहतात. त्यांना कोट्यवधी रुपयांचा पगार मिळतो. विशेष म्हणजे पगार वगळता त्यांना कोट्यवधी रुपये भत्ता म्हणूनही मिळतात. कोणत्या देशातील राष्ट्राध्यक्ष एवढे श्रीमंत आहेत पाहूयात...

3/12

emmanuel macron elysee palace

श्रीमंती आणि आलिशान राहणीमानासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची जगभरात चर्चा असते. राजधानी पॅरिसमधील आलीशान महालामध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष राहतात यावरुन त्यांना किती मान आहे हे समजतं. हा महालाला एलिसी पॅलेस असं म्हणतात. 

4/12

emmanuel macron elysee palace

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं सरकारी निवासस्थान असलेलं एलिसी पॅलेस ऐतिहासिकदृष्ट्याही फार खास आहे. मागील अनेक शतकांपासून या राजवाड्यासारख्या इमारतीमध्ये फ्रान्समधील शासक वास्तव्यास आहेत. सन 1960 साली एलिसी पॅलेसला फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं अधिकृत निवासस्थान म्हणून घोषित करण्यात आलं.

5/12

emmanuel macron elysee palace

एलिसी पॅलेस हे निवासस्थान व्हाइट हाऊसपेक्षाही खास आहे. जवळपास 300 वर्षांपूर्वी 1722 साली तयार करण्यात आलेल्या एलिसी पॅलेसमध्ये 365 रुम आहेत.

6/12

emmanuel macron elysee palace

एलिसी पॅलेसमधील 365 पैकी 364 रुमधून गार्डनचा व्ह्यू दिसतो. या वास्तूमध्ये अनेक शतकांपूर्वीच्या वस्तू आहेत.

7/12

emmanuel macron elysee palace

एलिसी पॅलेसची देखभाल, सुरक्षा आणि व्यवस्थापन करण्यासाठी 800 कर्मचारी काम करतात.

8/12

emmanuel macron elysee palace

एलिसी पॅलेसमध्ये जुन्या फर्निचरपासून ते नवीन सामानापर्यंत अनेक गोष्टी आहेत. या गोष्टींची देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर वेतन आणि भत्ते यासाठी तब्बल 1035 कोटी रुपये खर्च केले जातात.

9/12

emmanuel macron elysee palace

फ्रान्सचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे मेकअपवर 3 महिन्यांमध्ये तब्बल 23 लाख रुपयांहून अधिक खर्च केला होता. 

10/12

emmanuel macron elysee palace

इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या आधी राष्ट्राध्यक्ष असलेले फ्रांस्वा ओलांद यांनी मेकअपवर 27 लाखांपर्यंत खर्च केला होता. 

11/12

emmanuel macron elysee palace

मध्यंतरी तर राष्ट्राध्यक्षांचे केस कापणाऱ्या हेअरस्टायलिस्टला 9 लाख रुपयांचं पेमेंट करण्यात आलं होतं. या खर्चावरुन फ्रान्समध्ये अनेकदा टीका झाली आहे.

12/12

emmanuel macron elysee palace

इमॅन्युएल मॅक्रॉन यांना फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष पदावर असताना पगार म्हणून 5 वर्षांमध्ये 10 कोटी रुपये खर्च केले आहेत. वार्षिक पगाराबरोबरच त्यांना 196000 यूरोचं अतिरिक्त पेमेंट दिलं जातं. इमॅन्युएल मॅक्रॉन हे भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मोठे प्रशंसक आणि चांगले मित्र आहेत.