भारतातील 'या' नदीला आईचा नाही तर वडिलांचा दर्जा, लोक करतात पूजा, काय आहे नाव?

भारतीय संस्कृतीत नद्यांची पूजा केली जाते. सर्व नद्यांना माता मानून त्यांची देवी म्हणून पूजा केली जाते. मात्र, अशी एक नदी आहे जिला वडिलांचा दर्जा आहे. जाणून घ्या सविस्तर

| Oct 24, 2024, 13:44 PM IST
1/6

नद्यांची पूजा

भारतात जिथे नद्यांची देवी म्हणून पूजा केली जाते. अशाच एका नदीला वडिलांचा दर्जा दिला आहे. काय आहे त्या नदीचे नाव? 

2/6

नर नदी

भारतातही नर नदी असू शकते. होय, देशात एकच नर नदी आहे. जी ब्रह्मपुत्रा नावाने ओळखली जाते. 

3/6

ब्रह्मपुत्र नदी

भारतात लोक ब्रह्मपुत्र नदीला पुरुष म्हणजे वडील म्हणून पूजा करतात. ब्रह्मपुत्रा नदीबद्दल लोकांच्या मते ती भगवान ब्रह्माचा पुत्र मानली जाते. 

4/6

ब्रह्मपुत्र नदीची पूजा

ब्रह्मपुत्रा नदी ईशान्येकडील आसाम राज्यात वाहते. हिंदूंशिवाय बौद्ध आणि जैन धर्माचे लोक देखील या नदीची पूजा करतात. 

5/6

उगम

ही भारतातील सर्वात खोल आणि रुंद नदी आहे. तिची खोली 140 मीटर आहे. या नदीचा उगम मानसरोवर शेजारी असणाऱ्या कैलास पर्वतरांगेतील चेमायुंगडुंग हिमनदीपासून होतो. 

6/6

3 देशांमधून वाहते

ब्रह्मपुत्रा नदी तिबेट, भारत आणि बांगलादेश या तीन देशांमध्ये वाहते. तिची लांबी सुमारे 2900 किलोमीटर आहे.