महाराष्ट्रातील टॉप 10 पर्यटन स्थळे; आयुष्यात एकदा तरी इथं नक्की फिरुन या

महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे. जाणून घ्या या पर्यटन स्थळांची वैशिष्ट्ये.  

| Apr 07, 2024, 18:59 PM IST

Maharashtra Tourism : महाराष्ट्रात 36 जिल्हे आहेत. प्रत्येक जिल्हा हा वैशिष्ट्यपूर्ण आहे. यामुळे वेगवेगळी पर्यटळ स्थळ प्रत्येक जिल्ह्यालीा वेगळ महत्व प्राप्त करुन देतात. 

1/10

 सह्याद्रीच्या पर्वतरांना, अथांग समुद्र किनारा आणि ऐतिहासिक गड किल्ले... महाराष्ट्र हे देशाच्या पर्यटनाची राजधानी आहे. 

2/10

ताडोबा

ताडोबाची सफर हा रोमांकच अनुभव आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हा एक व्याघ्र प्रकल्प आहे. येथे वाघाला पाहण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. जीपमधून होणारी सफारी खरोखरच थरारक असते.

3/10

पुणे

पुणे ऐतिहासिक शहर म्हणून ही ओळखले जाते. सिंहगड, शनिवार वाडा, दगडू शेठ गणपती अशी अनेक पर्यटन स्थळ येथे आहेत.   

4/10

औरंगाबाद

औरंगाबाद अर्थात संभाजीनगर  लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. अजिंठा व एलोरा गुंफा, पाणचक्की, बीबी का मकबरा ही ठिकाणे प्रमुख आकर्षण आहे. 

5/10

रत्नागिरी

कोकण किनरपट्टीवर वसलेला रत्नागिरी जिल्हा महाराष्ट्रातील मोठा टूरीस्ट पॉईंट आहे. स्वच्छ समुद्र किनारे, मंत्रमुग्ध करणारे निसर्ग सौंदर्य प्राचीन मंदिरे तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची साक्ष देणारे गडकिल्ले हे प्रमुख आक्रषण आहे. गणपती पुणे, रत्नदुर्ग किल्ला, आरे वारे बीच, दापोली, श्रीवर्धन, गुहागर हे समुद्र किनारे देखूल खूपच सुंदर आहेत. 

6/10

कोल्हापूर

कोल्हापुरची महालक्ष्मी अनेकांचे श्रद्धास्थान आहे. रंकाळा तलावामुळे कोल्हापुर  चांगलाच प्रसिद्ध आहे.  कोल्हापुरा पन्हाळा, गगनबावडा ही देकील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. 

7/10

सातारा

साताऱ्या जिल्ह्यातील कास पठार  हे देखील पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे. यासह कोयना डॅम, कोयना अभयारण्य, अजिंक्यतारा किल्ला  या ठिकाणांना देखील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. 

8/10

नाशिक

नाशिक हे महाराष्ट्रातील देवभूमी म्हणून ओखळले जाते. अनेक त्र्यंबकेश्वर, पंचवटी यासह अनेक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे.   

9/10

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील मिनि काश्मिर म्हणून ओखळले जाते. देशभरातील पर्यटक महाबळेश्वरमधील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी येतात.  

10/10

माथेरान

माथेरान हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्टयन स्थळ आहे. सर्वात छोटं हिल स्टेशन आहे. मुंबई,  पुण्यापासून जवळ असल्याने विकेंडला येथे पर्यटकांची मोठी गर्दी असते.