ना रोहित ना विराट, वनडे क्रिकेटमध्ये 'हे' तीन धडाकेबाज फलंदाज ठोकू शकतात 'ट्रिपल सेंच्यूरी'

World Record In ODI: टी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये मोठे बदल झाल्याचं गेल्या काही महिन्यांपासून पहायला मिळत आहे. टी-ट्वेंटी क्रिकेटमुळे वनडे आणि टेस्ट क्रिकेटची पद्धत देखील बदलली आहे. अशातच आता वनडे क्रिकेटमध्ये ट्रिपल सेंच्युरी ठोकणारा फलंदाज कोण असेल? यावर चर्चा सुरू आहेत.

| Jul 22, 2024, 19:41 PM IST
1/5

रोहित शर्मा

वनडे क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर सर्वाधिक धावांचा रेकॉर्ड आहे. रोहित शर्माने 13 नोव्हेंबर 2014 मध्ये 264 धावांची खेळी केली होती. 

2/5

रोहित शर्माचा रेकॉर्ड

आता 10 वर्ष झाले तरी देखील रोहितचा रेकॉर्ड मोडण्याची बिशाद कोणाची झाली नाही. मात्र असे तीन खेळाडू आहेत, जे रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडतील आणि वनडेमध्ये ट्रिपल सेंच्युरी देखील ठोकतील.

3/5

सूर्यकुमार यादव

सूर्यकुमार यादव हा टीम इंडियाचा टी-ट्वेंटी संघाचा कॅप्टन आहे. टी-ट्वेंटी स्पेशलिस्ट म्हणून टीम इंडियामध्ये सूर्यकुमार यादवची निवड झाली होती. मात्र, सूर्याला वनडेमध्ये जास्त संधी मिळाली नाही. जर सूर्या वनडे खेळला तर तो आरामात ट्रिपल सेंच्युरी ठोकू शकतो.

4/5

जॉस बटलर

इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज जॉस बटलर वनडे क्रिकेट देखील खेळतो. जॉस बटलरची सर्वोत्तम धावसंख्या म्हणजे नाबाद 162 धावा. पण बटलरकडे नक्कीच ट्रिपल सेंच्युरी ठोकण्याची क्षमता आहे.

5/5

ग्लेन मॅक्सवेल

वनडे वर्ल्ड कपमधील ग्लेन मॅक्सवेलची वादळी खेळी सर्वांना माहितीच असेल. ग्लेन मॅक्सवेलचं वनडे क्रिकेट कमी काळासाठी शिल्लक आहे. मात्र, मॅक्सवेल उर्वरित कालावधीत ट्रिपल सेंच्युरी ठोकेल का? असा सवाल विचारला जात आहे.