King Charles III यांच्या राज्याभिषेकात एक नव्हे 'हे' तीन रत्नजडित मुकूट वेधणार संपूर्ण जगाचं लक्ष
King Charles III Coronation : (Queen Elizabeth II) राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र King Charles III यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात येणार असून, वेस्टमिंस्टर अॅबी येथे त्यांचा राज्याभिषेक पार पडेल. यानिमित्तानं शाही घराण्याचा खजिना संपूर्ण जगाला पाहता येणार आहे.
King Charles III Coronation : ब्रिटनच्या शाही घराण्याचा इतिहास सर्वज्ञात आहे. भारतावर राज्य करणाऱ्या या ब्रिटीशांबाबत कायमच कुतूहलानं असंख्य प्रश्न उपस्थित करण्यात आले. अशा या राजघराण्याची आणि राज्यकारभाराची सर्व सूत्र आजपासून अधिकृतरित्या King Charles III यांच्या हाती जाणार आहेत.