Wayanad भूस्खलनाला अरबी समुद्राचे तापमान जबाबदार? आतापर्यंत 158 जणांचा मृत्यू

वायनाड येथे उद्भवलेली भूस्खलनाची परिस्थिती भयावह आहे. यामध्ये 156 लोकांनी जीव गमावला आहे. 

Wayanad Landslide Reason : केरळ जी देवभूम, स्वर्ग भूमी म्हणून ओळखली जाते. तेथील वायनाड परिसरात झालेल भूस्खलन हे अतिशय भयानक आहे. आतापर्यंत 158 लोकांनी आपला जीव या नैसर्गिक आपत्तीमध्ये गमावला आहे. पण या भूस्खलनामागे काय कारण असू शकते, हे तज्ज्ञांनी सांगितले आहे. 

फोटो क्रेडिट : विनीत नागेपल्ली स्थानिक

1/10

हवामानातील बदल, जास्त खाणकाम आणि वृक्षतोड या सगळ्या गोष्टी एकत्रित आल्याने केरळमधील वायनाडमध्ये भूस्खलन झाले असावे, असे मत शास्त्रांनी मांडले आहे. 

2/10

मंगळवारी केरळच्या वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसाने भूस्खलनाची अक्षरशः मालिका सुरू झाली. ज्यामुळे 156 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक लोक जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अजूनही अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. येत्या दोन दिवसांत राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

3/10

2023 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरने जारी केलेल्या भूस्खलन ऍटलसनुसार, भारतातील 30 सर्वाधिक भूस्खलन-प्रवण जिल्ह्यांपैकी 10 केरळमध्ये आहेत, वायनाड 13 व्या क्रमांकावर आहे.

4/10

भारतातील भूस्खलन हॉटस्पॉट्सवरील 2021 च्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, केरळमधील एकूण भूस्खलनापैकी 59 टक्के भूस्खलन वृक्षारोपण क्षेत्रात झाले आहेत.

5/10

2022 मध्ये तसेच, वायनाडमधील कमी होत चाललेल्या वनक्षेत्रावरील अभ्यासात असे दिसून आले आहे की 1950 ते 2018 दरम्यान जिल्ह्यातील 62 टक्के जंगले गायब झाली होती, तर वृक्षारोपणाचे आच्छादन सुमारे 1,800 टक्क्यांनी वाढले होते.  

6/10

इंटरनॅशनल जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल रिसर्च अँड पब्लिक हेल्थमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात म्हटले आहे की वायनाडच्या एकूण क्षेत्रापैकी 85 टक्के क्षेत्र 1950 पर्यंत जंगलाखाली होते.  

7/10

जंगलांचे नुकसान झाल्यामुळे भूप्रदेशाची नाजूकता वाढते, विशेषत: पश्चिम घाटातील अतिवृष्टीची शक्यता असलेल्या भागात याचा सर्वाधिक फटका बसतो. 

8/10

कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी (CUSAT) मधील ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक रडार रिसर्चचे संचालक एस अभिलाष यांनी अरबी समुद्राच्या तापमानवाढीकडे लक्ष वेधले. राज्यातील अत्यंत मुसळधार आणि अप्रत्याशित पाऊस हे एक कारण आहे. 

9/10

"आमच्या संशोधनात असे आढळून आले की आग्नेय अरबी समुद्राचे तापमान वाढत आहे. ज्यामुळे केरळसह या प्रदेशातील वातावरण थर्मोडायनामिकली अस्थिर होत आहे," त्यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले.

10/10

2019 च्या केरळच्या पुरानंतर

अभिलाष म्हणाले की, अरबी समुद्राच्या तापमानवाढीमुळे तयार होणारा ट्रेंड शास्त्रज्ञांच्या लक्षात आला आहे. ज्यामुळे कमी कालावधीत अत्यंत मुसळधार पाऊस पडतो. वृक्ष नसल्यामुळे हा पाऊस थेट जमिनीच्या संपर्कात येतो तेव्हा भूस्खलनाचा धोका वाढतो. पुढे ते म्हणाले की, 2019 च्या केरळच्या पुरानंतर पावसाचा हा प्रकार दिसून आला आहे.