Weekly Horoscope : कोजागिरी पौर्णिमाच्या आठवड्यात शुक्रचं गोचर! संपत्तीचा कारक 5 लोकांना देणार राजाचं आयुष्य
Weekly Horoscope 14 to 20 october 2024 in Marathi : ऑक्टोबरचा तिसरा आठवडा अतिशय खास असणार आहे. कोजागिरी पौर्णिमेच्या या आठवड्यात संपत्तीचा कारक शुक्र गोचर करणार आहे. शुक्र ग्रह वृश्चिक राशीत प्रवेश करणार असून यामुळे मिथुनसह अनेक राशींसाठी राजाचं आयुष्य जणार आहे. असा हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या ज्योतिषशास्त्र पंडीत आणि आनंदी वास्तूचे आंनद पिंपळकरकडून मेष ते मीन राशीच्या लोकांचे राशीभविष्य
नेहा चौधरी
| Oct 14, 2024, 09:41 AM IST
1/12
मेष (Aries Zodiac)
![मेष (Aries Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802886-aries-1.png)
या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबरचा हा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. या काळात तुम्ही गुंतवणुकीत खूप बिझी राहणार आहात. या आठवड्यातील प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणाशी वाद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रकल्पांमध्ये अडचणी निर्माण होणार आहे. चांगल्या आरोग्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. एखाद्या महिलेमुळे व्यवसायात मतभेद आणि तणाव होण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी, एखाद्या वृद्ध व्यक्तीमुळे तुम्हाला वाईट वाटेल आणि धावपळ करावी लागणार आहे. शुभ दिवस: 15, 17
2/12
वृषभ (Taurus Zodiac)
![वृषभ (Taurus Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802885-taurus-2.png)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा असणार आहे. त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती होणार आहे. त्यांचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी अनेक संधी त्यांना मिळणार आहे. आर्थिक बाबतीत आर्थिक लाभ होणार असून भागीदारीत केलेली गुंतवणूक तुम्हाला शुभ परिणाम देणार आहे. या आठवड्यात तुमचे आरोग्य सुधारणार आहे. निरोगी असा हा आठवडा असणार आहे. या आठवड्यात सहली टाळणे तुमच्यासाठी चांगले ठरेल. मुलांच्या तब्येतीमुळे तुम्हाला धावपळ करावी लागणार आहे. शुभ दिवस: 16, 18
3/12
मिथुन (Gemini Zodiac)
![मिथुन (Gemini Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802883-gemini-3.png)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबींसाठी शुभ असणार असून आर्थिक फायदा होणार आहे. कुठेतरी अडकलेले पैसेही तुम्हाला परत मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी सुधारणा होणार असून आरोग्यातही सुधारणा दिसणार आहे. या आठवड्यात केलेले प्रवास यशस्वी करण्यासाठी तुम्हाला महिलांचे सहकार्य लाभणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात कौटुंबिक बाबींमध्ये अचानक शांतता जाणवेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून आणि व्यवसायात तुमच्या योजना यशस्वी झाल्यामुळे तुम्ही आनंदी असणार आहात. आठवड्याच्या शेवटी, आपण जीवनात यशस्वी व्हाल आणि प्रलंबित पैसे मिळाल्याने आनंदी व्हाल. शुभ दिवस: 19, 17
4/12
कर्क (Cancer Zodiac)
![कर्क (Cancer Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802882-cancer-4.png)
या लोकांना या आठवड्यात त्यांच्या कामाच्या ठिकाणी प्रगती पाहिला मिळणार आहे. त्यांच्या सन्मानही वाढणार आहे. तुमचा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी तुम्हाला तरुणांकडून पूर्ण सहकार्य लाभणार आहे. आर्थिक बाबतीत तुमची स्थिती सुधारणार आहे. तुमच्या योजना यशस्वी होणार आहेत. या आठवड्यात तुमची तब्येतही खूप उत्तम असणार आहे. तुम्ही तुमचा वेळ आनंदाने व्यतित करणार आहात. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे यश मिळणार असून तुम्ही प्रसन्न असणार आहात. कुटुंबातील महिलेच्या मदतीने तुम्हाला जीवनात सुख-शांती लाभणार आहे. आठवड्याच्या शेवटी कोणताही महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलणे तुमच्यासाठी हिताच ठरेल. शुभ दिवस: 15
5/12
सिंह (Leo Zodiac)
![सिंह (Leo Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802881-leo-5.png)
या लोकांसाठी आर्थिक बाबतीत हा आठवडा भाग्यशाली ठरणार आहे. आर्थिक लाभासह गुंतवणूक देखील फायदेशीर ठरणार आहे. ज्याचे व्यक्तिमत्व आकर्षक आहे अशा व्यक्तीकडून तुम्हाला तुमची संपत्ती वाढवण्यात मदत लाभणार आहे. तुमच्या आरोग्यात सुधारणा होणार असून तुम्हाला निरोगी वाटणार आहे. या आठवड्यात प्रवासात संयम राखून तुम्ही आनंदी राहणार आहात. कामाच्या ठिकाणी निराशा जाणवू शकते. एखाद्या गोष्टीबद्दल मनात शंका येऊ शकते. आठवड्याच्या शेवटी आयुष्यात अनेक बदल दिसून येतील. शुभ दिवस: 15, 20
6/12
कन्या (Virgo Zodiac)
![कन्या (Virgo Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802880-virgo-6.png)
कोजागिरीचा हा आठवडा या लोकांसाठी आर्थिक प्रगती घेऊन येणार आहे. प्रवासातून तुम्हाला आनंद मिळणार आहे. व्यवसायात तुमच्या योजना यशस्वी होतील. आर्थिक बाबतीत यश मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या मनाचे ऐकावे, तरच फायदेशीर ठरणार आहे. स्वतःवर विश्वास ठेवून निर्णय घेतला तर यश मिळवण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवाल आणि प्रियजनांसोबत सणाच्या मूडमध्ये तुम्ही राहणार आहात. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या जीवनात थोडा आराम मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी, तुम्हाला तुमच्या करिअरच्या संदर्भात काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. शुभ दिवस: 16, 19
7/12
तूळ (Libra Zodiac)
![तूळ (Libra Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802879-libra-7.png)
तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी अचानक यश मिळणार असल्याने तुमचा आनंद गगणात मावणार नाही. आर्थिक बाबतीतही वेळ सुधारणार आहे. या आठवड्यात, प्रवासातून शुभ परिणाम मिळणार आहेत. तुम्ही तुमचे प्रवास चांगल्या नियोजनाने पूर्ण करणार आहात. कुटुंबासोबत आनंदात वेळ व्यतित करणार आहात. आठवड्याच्या मध्यात एखाद्या विषयावर तणाव जाणवणार आहे. तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम पाहिला मिळू शकतो. आठवड्याच्या शेवटी, वेळ अनुकूल होणार असून तुम्ही खरेदी करण्याच्या मूडमध्ये असणार आहात. खर्च करताना, हे लक्षात ठेवा की आवश्यकतेपेक्षा जास्त खर्च करू नका, अन्यथा आर्थिक अडचणीचा सामना करावा लागेल. शुभ दिवस: 14, 15
8/12
वृश्चिक (Scorpio Zodiac)
![वृश्चिक (Scorpio Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802878-scorpio-8.png)
तुम्हाला हा आठवडा मालामाल करणारा ठरणार आहे. आर्थिक लाभाच्या अनेक संधी तुमच्या आयुष्यात येणार आहेत. जर तुम्ही या आठवड्यात कोणतीही नवीन आरोग्य कृती सुरू केली तर ते तुमच्यासाठी दीर्घकाळ निरोगी राहण्याचा मार्ग खुला करणार आहे. या आठवड्यात तुम्ही कोणत्याही सहलीला जाण्यापूर्वी थोडे संकोच राहाल. पण पुढे जाऊन प्रवास केल्यास यश तुमच्या पायांचे चुंबन घेईल हे नक्की. कुटुंबातील परस्पर प्रेम दृढ होईल आणि प्रेम वाढेल. आठवड्याच्या शेवटी जुन्या आठवणी ताज्या होतील. शुभ दिवस: 18, 20
9/12
धनु (Sagittarius Zodiac)
![धनु (Sagittarius Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802877-sagittarius-9.png)
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत आनंददायी ठरणार आहे. तुमच्या सुखसोयींमध्ये वाढ होणार आहे. वडिलांच्या मदतीने तुम्हाला फायदा मिळणार आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. या आठवड्यात खर्च वाढणार आहे. कामाच्या ठिकाणी काही बातम्या तुम्हाला दुःखी वाटणार आहे. कुटुंबात तरुणपणामुळे त्रास होण्याची दाट शक्यता आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासाचे परिणाम आनंददायी असणार आहे. आठवड्याच्या शेवटी, एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धीचा शुभ योगायोग घडणार आहे. शुभ दिवस: 15, 16
10/12
मकर (Capricorn Zodiac)
![मकर (Capricorn Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802876-capricorn-10.png)
या लोकांना प्रगतीचे दरवाजे उघडणार आहे. ऑफिसमध्ये एखाद्या मोठ्या प्रकल्पासाठी तुमची निवड होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासातून तुम्हाला चांगले यश लाभणार आहे. कौटुंबिक बाबींमध्ये शहाणपणाने वागल्यास तुमचे मन प्रसन्न राहणार आहे. भावनिक कारणांमुळे तुम्ही आर्थिक बाबींमध्ये जास्त खर्च करू शकता. कुटुंबातील कोणत्याही युवकाबद्दल मन चिंतेत राहील. आठवड्याच्या शेवटी जीवनात अडचणी येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी, आपण इच्छित बदल साध्य करण्यासाठी आपले प्रयत्न तीव्र कराल. शुभ दिवस: 14, 18
11/12
कुंभ (Aquarius Zodiac)
![कुंभ (Aquarius Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802875-aquarius-11.png)
या लोकांसाठी दिवाळीपूर्वीच दिवाळी असणार आहे. आर्थिक लाभासह कामाच्या ठिकाणी अपेक्षित प्रगती पाहिला मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आनंदी आनंद असणार आहात. आठवड्याच्या सुरुवातीला तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी घेऊन येणार आहे. जर तुम्ही बॅकअप प्लॅन घेऊन पुढे गेलात तर तुम्हाला आयुष्यात यश मिळणार आहे. तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला तुमच्या बाजूने कठोर परिश्रम करावे लागणार आहे. कौटुंबिक बाबी सुधारणा होणार आहे. या आठवड्यात केलेल्या प्रवासामुळे यश मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी काही बाहेरच्या व्यक्तीमुळे काही समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. शुभ दिवस: 17,19
12/12
मीन (Pisces Zodiac)
![मीन (Pisces Zodiac)](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/10/14/802874-pisces-12.png)