Weekly Numerology : सप्टेंबरचा शेवटचा आठवडा या जन्मतारखेच्या लोकांसाठी असणार लकी, जाणून घ्या तुमच्या नशिबात काय?

Saptahik Ank jyotish 23 to 29 september 2024 In Marathi : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. सप्टेंबरचा शेवटचा आठवड्यात अनेक शुभ योग जुळून येणार आहे. पितृ पक्षाच्या श्राद्धाव्यतिरिक्त या आठवड्यात कालाष्टमी, मासिक प्रदोष व्रत यासारखे सण असणार आहेत. पितृ पक्षाचा हा आठवडा काही लोकांसाठी आर्थिक फायद्याचा असणार आहे.

Sep 22, 2024, 18:16 PM IST
1/9

मूलांक 1

या आठवड्यात आर्थिक दृष्टिकोनातून काळ चांगला असणार आहे. आर्थिक लाभाच्या चांगल्या संधीही मिळणार आहेत. कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने निर्णय घेतल्यास चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. प्रेम जीवनात रोमान्स असणार आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात वेळ अनुकूल असणार असून तुमचे मन प्रफुल्लित राहणार आहे. 

2/9

मूलांक 2

आर्थिक बाबींसाठी हा आठवडा चांगला असणार आहे. या आठवड्यात आर्थिक लाभाचीही शुभ शक्यता निर्माण होत आहे. या आठवड्यात तुमचे पैसे कुठेतरी अडकणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही लेखी कामाचा नीट विचार केल्यास बरे होणार आहे. तुमचे गैरसमज वाढण्याची शक्यता आहे. सप्ताहाच्या शेवटी तुमच्या जीवनात सुख-समृद्धीचे योगायोग असणार आहे. 

3/9

मूलांक 3

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. या आठवड्यात तुम्हाला तुमच्या प्रकल्पांचे शुभ परिणाम मिळणार आहेत. प्रेमसंबंधांमध्ये संतुलन राखून तुम्ही तुमच्या आयुष्यात पुढे वाटचाल केल्यास चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत आपण भविष्याभिमुख राहिलो तर बरे परिणाम मिळतील. आठवड्याच्या शेवटी वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात सुख-समृद्धी नांदणार आहे. 

4/9

मूलांक 4

प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम संबंध मजबूत होणार आहे. प्रेम जीवनात सुखद अनुभव येणार आहे. या आठवड्यात वाटाघाटीतून प्रकरणे सोडवल्यास चांगले परिणाम मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला दिलेली आश्वासने अजून पूर्ण होताना दिसत नाहीत. तुम्ही बॅकअप योजनेसह पुढे गेल्यास, तुम्हाला चांगले परिणाम दिसणार आहेत. या आठवड्यात तुम्ही व्यावहारिक पद्धतीने गुंतवणूक केल्यास आर्थिक स्थिती हळूहळू सुधारणार आहे. आठवड्याच्या शेवटी, आपण काहीतरी नवीन शिकल्यास आणि आपल्या जीवनात पुढे गेल्यास, चांगले परिणाम मिळणार आहे. 

5/9

मूलांक 5

या आठवड्यात तुमच्या जीवनात वेळ अनुकूल असणार आहे. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढणार असून सन्मानही वाढणार आहे. आर्थिक बाबतीतही काळ हळूहळू अनुकूल होणार आहे. आर्थिक लाभाचे शुभ संकेत मिळणार आहे. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम दृढ होणार आहे. प्रेम जीवनात आनंद राहणार आहे. सप्ताहाच्या शेवटी जीवनात सुख-समृद्धीचे शुभ संयोग असणार आहेत. 

6/9

मूलांक 6

हा आठवडा तुमच्यासाठी गोड आणि आंबट अनुभव घेऊन येणार आहे. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम करून तुम्ही बरेच काही साध्य करू शकता. थोडा संयम ठेवला तर जीवनात प्रगतीचे मार्ग खुले होणार आहे. आर्थिक संपत्तीची आवक होणार असून कोणत्याही प्रवासात अतिरिक्त खर्च होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये तुम्हाला अस्वस्थ वाटू शकतं.

7/9

मूलांक 7

आर्थिक बाबींसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. प्रगती होणार आहे. कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या बाह्य हस्तक्षेपामुळे समस्या वाढणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम सुधारणार आहे. प्रेम जीवनात सुखद अनुभव येणार आहेत. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटणार आहे. 

8/9

मूलांक 8

नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार असून मान-सन्मानही वाढणार आहे. या आठवड्यापासून तुमचे प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. आर्थिक बाबींसाठीही हा आठवडा शुभ असणार असून संपत्ती वाढ होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये या आठवड्यात तुम्ही केलेली मेहनत भविष्यात सुखद परिणाम देणार आहे. आठवड्याच्या शेवटी चर्चा करून परिस्थिती सोडवली तर बरे होणार आहे.

9/9

मूलांक 9

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार असून प्रकल्प यशस्वी होणार आहे. तुम्ही खूप दिवसांपासून मेहनत करत आहात त्या मेहनतीच फळ या आठवड्यात मिळणार आहे. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम वाढणार असून सुखद अनुभव मिळणार आहे. या आठवड्यात आर्थिक बाबींसाठी काळ कठीण असणार आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. (Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती अंक शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)