Weekly Numerology : श्रावणापूर्वीचा हा आठवडा जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या
Saptahik Ank jyotish 29 July to 4 August 2024 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अंकशास्त्र हेदेखील एक शास्त्र आहे. यामध्ये तुमच्या मूलांकावरुन तुमचं भविष्य आणि तुमच्या स्वभावाबद्दल सांगितलं जातं. तुमचा मूलांक हा तुमची जन्म तारीख असतं. जर तुमची जन्म तारीख ही दोन अंकी असेल उदाहरणात 24 तर तुमचा मूलांक हा 2+4 = 6. तर हा 6 क्रमांक तुमचा मूलांक असतो. चला तर मग 1 ते 9 अंक असलेल्या लोकांसाठी 29 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंतचा हा आठवडा कसा जाणून घेऊयात.
नेहा चौधरी
| Jul 29, 2024, 08:50 AM IST
1/9
मूलांक 1

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभणार आहे. प्रगतीचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहे. आर्थिक बाबींमध्ये काळ अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभाची चांगली शक्यता या आठवड्यात आहे. प्रेमसंबंधात काही कारणाने वाद होण्याची शक्यता आहे. याकडे लक्ष देण्याची गरज असून आठवड्याच्या शेवटी परिस्थिती कठीण होऊ शकते.
2/9
मूलांक 2

3/9
मूलांक 3

प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम दृढ होणार आहे. तुमच्या जीवनात एक नवीन सुरुवात आणि आनंद दार ठोठावणार आहे. कामाच्या ठिकाणी हळूहळू सुधारणा होणार आहे. आर्थिक बाबतीत वेळ प्रतिकूल असणार आहे. निष्काळजीपणामुळे अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्ही भविष्यासाठी योजना आखणार आहात. जीवनात शांतता असणार आहे.
4/9
मूलांक 4

आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असणार आहे. कोणतीही दोन गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिणाम देणार आहे. संपत्तीत वाढ होण्याच्या शुभ संधी असणार आहेत. तुमच्या प्रेमसंबंधात तुम्हाला हवे असलेले बदल साध्य होण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे. कामाच्या ठिकाणी अहंकाराचा संघर्ष वाढणार आहे. प्रकल्पांमुळे तणावही वाढणार आहे. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला आयुष्यात एकटेपणा जाणवणार आहे.
5/9
मूलांक 5

आर्थिक बाबतीत काळ अनुकूल असणार आहे. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होणार आहे. प्रेमसंबंधांमध्ये, परस्पर प्रेम दृढ होणार आहे. प्रेम जीवनात आनंदी काळ असणार आहे. प्रेम जीवनात परस्पर प्रेम दृढ होणार आहे. कार्यक्षेत्रातील तुमचे प्रकल्प अचानक यशाच्या दिशेने वाटचाल करणार आहे. आठवड्याच्या शेवटी चर्चेने प्रकरणे सोडवली तर बरे परिणाम मिळणार आहेत.
6/9
मूलांक 6

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पाकडे आकर्षित होणार आहात. तुम्ही ते कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहात. आर्थिक बाबतीत कोणतीही नवीन गुंतवणूक तुमच्यासाठी शुभ परिणाम देणारी ठरणार आहे. या आठवड्यात संपत्ती, सुख आणि समृद्धी वाढणार आहे. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम अधिक घट्ट होणार आहे तर प्रेम जीवनात आनंदच आनंद असणार आहे. सप्ताहाच्या शेवटी सुख-समृद्धी तुमच्या दारात येणार आहे.
7/9
मूलांक 7

नोकरीच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. नवीन प्रकल्पाद्वारे यश मिळणार आहे. आर्थिक बाबींमध्ये, भागीदारीत केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी आर्थिक लाभासाठी परिस्थिती निर्माण करणार आहे. तुमच्या प्रेमसंबंधातील भविष्याबद्दल तुम्ही जितका जास्त विचार कराल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी तणाव वाढणार आहे.
8/9
मूलांक 8

कामाच्या ठिकाणी प्रगती होणार आहे. भावनिकदृष्ट्या वेळ अनुकूल असणार आहे. प्रकल्प यशाच्या मार्गावर पुढे जाणार आहात. प्रेमसंबंधात, परस्पर प्रेम दृढ होणार असून प्रेम जीवनात सुखद परिणाम मिळणार आहेत. आर्थिक बाबींमध्ये एकटेपणा जाणवणार आहे. खर्च अधिक वाढणार आहे. सप्ताहाच्या शेवटी परिस्थिती अनुकूल राहणार असून मन प्रसन्न असणार आहे.
9/9
मूलांक 9
