पृथ्वी फिरायची थांबली तर? जीवसृष्टी असणाऱ्या या एकमेव ग्रहाचा वेग मंदावतोय

Earth Rotation Speed : धोक्याची पूर्वसूचना... पृथ्वीची गती मंदावतेय? पाहा जीवसृष्टीवर कसा होईल याचा परिणाम. अवकाश क्षेत्रातून लक्ष वेधणारी बातमी समोर. 

Sayali Patil | Jan 31, 2025, 11:26 AM IST

Earth Rotation Speed : जीवसृष्टीचं अस्तित्वं असणाऱ्या पृथ्वीविषयी तुम्हालाही कुतूहल वाटतंय?

 

1/8

अवकाश

what if Earth stops rotating did you know its rotation speed

Earth Rotation Speed : शालेय जीवनामध्ये अनेकदा अवकाश, पृथ्वी, सूर्य, चंद्र, ग्रह-तारे असे शब्द सातत्यानं लिहिण्या-वाचण्यात येतात. याच ग्रहताऱ्यांच्या विश्वातील काही अशी रहस्य विविध अंतराळ संशोधन संस्थांनी समोर आणली आहेत, की पाहणारेही अवाक्  झाले. त्यातीलच एक बाब म्हणजे पृथ्वीचं परिभ्रमण आणि परिक्रमण. 

2/8

व्याख्या आठवतायत का?

what if Earth stops rotating did you know its rotation speed

पृथ्वी कायम स्वतःच्या अक्षाभोवती फिरणे तिच्या या कृतीचा परिभ्रमण असं म्हणतात. तर, पृथ्वी स्वत:भोवती फिरता फिरता सूर्याभोवतीसुद्धा फिरते या कृतीला परिक्रमण असं म्हटलं जातं. पृथ्वीच्या या दोन्ही गतींमुळं दिवस-रात्रीचं चक्र सक्रिय राहून पृथ्वीवर ऋतूबदलही होताना दिसतात.    

3/8

एक पूर्ण फेरी

what if Earth stops rotating did you know its rotation speed

स्वत:भोवती एक पूर्ण फेरी मारण्यासाठी पृथ्वीला 24 तासांचा कालावधी लागतो. हेच 24 तास म्हणजे एक दिवस असं गणित मानलं जातं. पण, येत्या काळात त्यातही बदल होऊ शकतो कारण एक संपूर्ण दिवस 24 ऐवजी 25 तासांचा होऊ शकतो. 

4/8

जीवसृष्टी

what if Earth stops rotating did you know its rotation speed

काही अहवालांमध्ये यामागचं कारण सांगण्यात आलं असून, पृथ्वीची स्वत:भोवती फिरण्याची गती हळुहळू मंदावत चालली आहे असं म्हटलं जात आहे. पण, या साऱ्याचा मानवी अस्तित्वं आणि जीवसृष्टीवर नेमका काय आणि कसा परिणाम होतोय माहितीये?   

5/8

365 दिवसांचा कालावधी

what if Earth stops rotating did you know its rotation speed

पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी 365 दिवसांचा कालावधी लागतो. स्पेस डॉट कॉमच्या माहितीनुसार पृथ्वी सूर्याभोवती ताशी 67,100 मैल इतक्या वेगानं फिरे. 

6/8

परिक्रमण

what if Earth stops rotating did you know its rotation speed

सेकंदांच्या हिशोबानं ही आकडेवारी मोजायची झाल्यास पृथ्वी सूर्याच्या चारही बाजूंनी 30 किमी प्रति सेकंद इतक्या वेगानं परिक्रमण करते. पण, आता हाच वेग मंदावत आहे, असं असलं तरीही हा वेग मंदावण्याची प्रक्रियासुद्धा अत्यंत धीम्या गतीनं सुरू आहे. लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीवर एक दिवस हा फक्त 22 तासांचा होता. जवळपास एक अब्ज वर्षांपासून पृथ्वीची गती मंदावत गेली आणि दिवसाचे तास वाढले.   

7/8

पृथ्वीचा वेग

what if Earth stops rotating did you know its rotation speed

दर शतकामध्ये दिवसाचा कालावधी दोन मिलिसेकंदांनी वाढत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे पृथ्वीचा वेग मंदावण्यास समुद्री तरंग, पृथ्वीच्या पृष्ठाकडे आकर्षित होणारी हवा यांच्यातील घर्षण कारणीभूत ठरत आहे. त्यात भर पडत आहे ती म्हणजे जागतिक तापमानवाढीची. 

8/8

एक वेळ अशीही येईल...

what if Earth stops rotating did you know its rotation speed

पृथ्वीचा फिरण्याचा वेग मंदावत एक वेळ अशीही येईल जेव्हा ही गती पूर्णपणे थांबलेली असेल. असं झाल्यास पृथ्वीचं वातावरण मात्र त्याच गतीनं फिरत राहील आणि याच कारणानं पृष्ठावर स्थिर न राहणारी कोणतीही वस्तू, इमारती, झाडं इत्याही वस्तू वाऱ्याच्या झोतासमवेत वाहून जातील. पृथ्वी फिरायची थांबली तर, या ग्रहाच्या प्रत्येक भागाला सलग सहा महिने सूर्यप्रकाश आणि तब्बल सहा महिने अंधार अशा चक्राचा सामना करावा लागेल.