हा क्रिकेटर जेवायला गेल्यावर वेटर समजून ऑर्डर द्यायचे लोक, ओळखलंत का?

टीम इंडियाचा स्टार खेळाडू हार्दिक पांड्याचा जन्म 11 ऑक्टोबर 1993 रोजी गुजरातमध्ये झाला. यावेळी मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. हार्दिकचे वडील हिमांशू पंड्या लहान कार फायनान्स व्यवसाय चालवत होते. आज हार्दिक पंड्याच्या वाढदिवशी आपण त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत.

Oct 11, 2023, 13:22 PM IST
1/5

हार्दिककडे वडोदऱ्यामध्ये एक आलिशान पेंटहाऊस आहे. हार्दिकचे पेंटहाऊस 6,000 स्क्वेअर फूट असून त्यात आधुनिक जीवनातील सर्व सोयी आहेत. पेंटहाऊसमध्ये जीम आणि सिनेमा हॉल आहे. त्याचसोबत हार्दिककडे अनेक आलिशान गाड्या देखील आहेत.  

2/5

मात्र यामागे हार्दिकची प्रचंड मेहनत आहे. लहानपणापासून हार्दिकने खूप गोष्टींचा सामना केला. एका मुलाखतीत त्याने, त्याला ढाब्यावर वेटर समजलं असल्याचा किस्सा सांगितला होता.   

3/5

हार्दिकने सांगितलं होतं की, मी लहानपणी वेगळा दिसत होते, माझे केस खूप लहान होते. मी माझ्या आईशिवाय कधीच ढाब्यावर जेवायला गेलो नाही कारण लोकांना वाटत होते की मी फक्त ढाब्यावर काम करतो. 

4/5

हार्दिकने पुढे सांगितलं की, मी जेव्हाही हात धुवायला जायचो तेव्हा लोक मला ताट उचलायला किंवा जेवणाच्या ऑर्डर घ्यायला सांगत असत.

5/5

इतकंच नव्हे तर कृणाल पंड्यानेही हार्दिकची त्याच्या केसांवरून खिल्ली उडवली होती.