तुमचा कोणी पाठलाग करत असेल तर कुठे तक्रार करायची?

Stalking : देशात गंभीर प्रकरणांनंतरही महिल्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच आहे. अनेक वेळा एकट्या महिलेला किंवा मुलीला पाहून तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला जातो किंवा पाठलाग केला जातो. काहीवेळा महिला किंवा मुली मोठ्या हिमतीने तिथेच त्या व्यक्तीला उत्तर देतात. तर काहीवेळा मुली घडलेल्या प्रकारामुळे घाबरून जातात. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांना धाक राहत नाही. मात्र भारतात अशा कृत्यांसाठी कठोर शिक्षा आहे.

May 07, 2023, 19:18 PM IST
1/6

jail

भारतीय दंड संहितेच्या कलम 354 मध्ये महिलांविरोधातील वाढते गुन्हे आणि यासंदर्भात केलेले कायद्यांविषयी यांचा तपशीलवार उल्लेख आहे.

2/6

crime news

कोणताही पुरुष जो चुकीच्या हेतूने एखाद्या महिलेचा पाठलाग करतो त्याला 354 या कलमाखाली शिक्षा होते. कोणत्याही महिलेचा पाठलाग करताना एखादी व्यक्ती पकडली गेल्यास त्याला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंड होऊ शकतो. जर आरोपी याच गुन्ह्यात दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास, गुन्हेगारास पाच वर्षांपर्यंत कारावास आणि दंड होऊ शकतो.

3/6

indian police

एखाद्या मुलीच्या सुरक्षेसाठी कायद्यातून कोणाला असे करण्याचा आदेश देण्यात आला असेल तर त्याला पाठलाग म्हणता येणार नाही, असेही या कलमात सांगण्यात आले आहे. मात्र त्यासाठी त्या व्यक्तीला तसा आदेश मिळाल्याचे पुरावे सादर करावे लागतील

4/6

National Commission for Women

जर कोणी तुमचा पाठलाग करत असेल आधी पोलीस ठाण्यात जा आणि तक्रार दाखल करा. पोलीस ठाणे दूर असल्यास 1091 वर फोन करून तक्रार करा. तुम्ही राष्ट्रीय महिला आयोगाच्या वेबसाइटवर जाऊन तुमची तक्रार नोंदवू शकता.

5/6

mumbai court

गेल्या वर्षी एका अल्पवयीन मुलीचा पाठलाग केल्याप्रकरणी एका व्यक्तीला आयपीसीच्या कलम 354D अंतर्गत मुंबई कोर्टाने दोषी ठरवत दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठवली होती. 

6/6

Court

माझ्या कामाला जाण्याचा रस्ता हाच असल्याचे त्या आरोपीचे म्हणणे होते. मात्र कोर्टाने हा युक्तिवाद फेटाळून लावला होता आणि मुलींना माहिती असते की त्यांच्या मागे कोण आहे आणि कोण पुढे जात आहे, असे म्हटले होते.