International Plastic Bag Free Day: मनुष्य, पृथ्वीसाठी एवढा घातक प्लॅस्टिक कुणी आणि का बनवला?

International Plastic Bag Free Day 2024 : पर्यावरण आणि पर्यायाने मानवासाठी हानिकारक असलेल्या प्लास्टिक बॅग बाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी 3 जुलै रोजी 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस' साजरा केला जातो.  दररोज जगातील महासागर, नद्या आणि तलावांमधून 2,000 ट्रक भरुन प्लास्टिक कचरा फेकला जातो. गेल्या काही काळापासून प्लास्टिकचा वाढता वापर पर्यावरणाच्या प्रदूषणाला कारणीभूत ठरलं आहे. ज्यामुळे लाखो लोकांच्या आणि जनावरांच्या जीवनावर विपरित परिणाम होतो. प्लास्टिक प्रदूषणाची जागरुकता निर्माण करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय प्लास्टिक बॅग मुक्त दिवस' साजरा केला जातो. 

| Jul 03, 2024, 14:41 PM IST
1/7

प्लास्टिकची निर्मिती कुणी केली?

बेल्जियममध्ये जन्म झालेल्या अमेरिकेतील वैज्ञानिक लियो बेकलँड यांनी प्लास्टिकचा शोध लावला. यांचे वडिल मोची असून ते अशिक्षित होते. त्यांना मुलाला याच व्यवसायात आणायचे होते. पण आईच्या मदतीने लियो यांनी नाईट स्कूलमध्ये शिक्षण घेतलं.  लियो यांनी अमेरिकेतील आपल्या शिक्षकाच्या मुलीशी वयाच्या 20 व्या वर्षी लग्न केलं. यांनी आपल्या घरीच एक लॅब तयार केली. जेथे त्यांनी 1907 साली फॉरमलडेहाइड आणि फेनॉल सारख्या केमिकलच्या मदतीने प्लास्टिकची निर्मिती केली. 

2/7

ना जळणार ना विरघळणार

टाइम मॅगजीनला दिलेल्या मुलाखतीत लियो बेकलँड यांनी म्हटले की, हे ना जळणार ना विरघळणार. बेकलँड यांच्या म्हणण्यानुसार हा अविष्कार भविष्यासाठी महत्त्वाचा ठरेल. कारण तोपर्यंत प्लास्टिक लोकप्रिय होत चाललं होतं. 

3/7

प्लास्टिकच्या अगोदर काय?

प्लास्टिकच्या अगोदरही याचा वापर केला जात होता. सेल्युलाइडचा वापर केला जात असे. हे पानांवर अवलंबून होते. पण प्लास्टिकसाठी कोणत्याही नैसर्गिक घटकाचा वापर केलेला नाही. पण आज हेच प्लास्टिक निसर्गासाठी हानिकारक आहे.   

4/7

मात्र आता प्लास्टिक घातक

शताब्दीनंतर प्लास्टिकचे उत्पादन 20 पट वाढले आहे. हे प्लास्टिक आज पृथ्वी आणि मानवासाठी घातक ठरत आहे. प्लास्टिक समुद्रात पोहोचल्यामुळे त्याचा जैवी घटकांवर विपरित परिणाम होत आहे. 

5/7

रिसायकलिंग स्तर

प्लास्टिकपासून तयार झालेल्या गोष्टींवर एक ते सात असे नंबर लिहिलेले असतात. यावरुन रिसायकलिंग करण्यास मदत होते. यासोबतच प्लास्टिकचा कचरा आणि नॅनो पार्टिकल्स यांच्यासोबत शेतीचा कचरा एकत्र करून नवीन साहित्य तयार करण्याचा प्रयोग सुरू आहे.

6/7

प्लास्टिकच्या पिशवीची निर्मिती का केली?

प्लास्टिकची पिशवी सांभाळण्यासाठी अतिशय हलकी  प्लास्टिक पिशवी खूप काळ टिकते  प्लास्टिक विद्युतप्रवाह मुक्त आहे  त्यामुळे थेट प्लास्टिकचा कोणताही धोका नाही 

7/7

प्लास्टिक पिशव्यांना पर्याय काय

कापडी पिशवी हा प्लास्टिक पिशवीला सर्वोत्तम पर्याय आहे.  नारळ पाणी विकत घेताना पिशवीत न घेता डब्यात किंवा बॉटलमध्ये घ्या  शक्य तेथे कागदी किंवा कापडी पिशव्यांचा वापर करा