PHOTO : कोण आहे विनोद कांबळीची दुसरी पत्नी अँड्रिया हेविट? आधी मॉडेल आता...

गेल्या काही दिवसांपासून विनोद कांबळी त्याचा प्रकृतीमुळे चर्चेत आहे. क्रिकेटपेक्षा त्याच वैयक्तिक आयुष्य जास्त प्रकाशझोत आलं. विनोदने एक नाही दोन लग्न केली आहे. पण तरीदेखील तो आज एकटा आहे. 

| Dec 09, 2024, 16:24 PM IST
1/10

मुंबईत काही दिवसांपूर्वी शिवाजी पार्कमध्ये रमाकांत आचरेकर यांच्या पुतळ्याच अनावरण करण्यात आलं. त्यावेळी विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकर या दोन जुन्या मित्रांची भेट झाली. या क्षणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात विनोद कांबळीची प्रकृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर विनोद कांबळीच्या आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. 

2/10

विनोद कांबळीचा जन्म 18 जानेवारी 1972 रोजी इंदिरा नगर, कांजूरमार्ग, मुंबई इथे झाला. विनोदचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबात झाला होता. मात्र त्याच्या मेहनत आणि क्षमतेमुळे त्याने भारतीय संघात आपलं स्थान निर्माण केलं. दमदार करिअर असलेला विनोद कांबळी नेहमीच चर्चेत असतो. वैयक्तिक आयुष्यामुळे तो कायम प्रकाशझोतात राहिला. त्याने दोन लग्न केली. 

3/10

विनोद कांबळीचं पहिलं लग्न 1998 मध्ये नोएला लुईसशी झालं होतं. नोएला ही पुण्यातील हॉटेल ब्लू डायमंड रिसेप्शनिस्ट म्हणून काम करत होती. विनोदने (Vinod Kambli Love Story) वयाच्या 26व्या वर्षी नोएलाशी लग्न केलं. पण हे लग्न फार काळ टिकले नाही. गॉसिप कॉलम्समध्ये विनोद कांबळी आणि नोएला लुईस यांच्या विभक्त होण्याचे कारण विनोदचे अति प्रमाणात मद्यपान बोलं गेलं होतं. 

4/10

विनोद कांबळीने दुसरं लग्न मॉडेल अँड्रिया हेविटशी केलं. कांबळी आणि हेविट यांना एक मुलगा आणि एक सुंदर मुलगी आहे. मुलीचे नाव जोहाना क्रिस्टियानो आणि मुलाचे नाव जीसस क्रिस्टियानो कांबळी असं आहे. 

5/10

लग्न करण्यासाठी कांबळीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. सहा वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर कांबळी आणि अँड्रियाने 2006 मध्ये कोर्ट मॅरेज केले होतं. पण 2014 मध्ये, कांबळीने अँड्रियाशी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला, यावेळी भव्य लग्न करण्यात आलं. 

6/10

हे लग्न चर्चेत आलं कारण यावेळी त्याच्या एकुलत्या एक मुलगा या लग्नाला उपस्थितीत होता. आई वडिलांचं लग्न पाहून तो भारावला होता. 

7/10

आंद्रिया हेविट तिच्या काळात खूप लोकप्रिय मॉडेल होती. तिचे फोटो जाहिरातींसाठी मासिकांच्या पहिल्या पानांवर असायची. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी स्वत:ला प्रसिद्धीपासून पूर्णपणे दूर ठेवलंय. 

8/10

अँड्रिया हेविटने तनिष्क ज्वेलरी ब्रँडमधून मॉडेलिंग करिअरची सुरुवात केली होती. यानंतर तिने स्वप्नांच्या नगरी, मुंबईत सौंदर्य सल्लागार म्हणून दीर्घकाळ काम केलं. 

9/10

पण या लग्नातही अचानक वेगळं वळण घेतलं. विनोदवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करण्यात आला. अँड्रियाने तिच्या पतीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप करत वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला होता. 

10/10

अँड्रियाने दावा केला की कांबळीने कथितपणे तिच्यावर कुकिंग पॅन फेकले, ज्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत झाली. मात्र आज  हे जोडपे एकत्र राहतात की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.