PHOTO: रात्री झोप पूर्ण होऊनही सकाळी थकवा जाणवतो? कारण आणि उपाय एकदा वाचाच!
Morning Weakness: दिवसभराचा थकवा घालवण्यासाठी 7-8 तास रात्रीची झोप होणे आवश्यक आहे. पण अनेकदा झोप पूर्ण होऊनही सकाळी उठल्यावर थकवा जाणवतो. पण असं का होतं? आणि यावर उपाय काय? हे जाणून घेण्यासाठी बातमी पूर्ण वाचा.
Morning Weakness Causes: दिवसाची सुरूवात चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो. पण जर सकाळी झोपेतून उठल्यावर तुम्हाला शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर दिवसभर तुमचा मूड फ्रेश राहत नाही. खरं तर रात्रीची 7 ते 8 तास झोप आपल्या शरीराला आराम देण्यासाठी पुरेशी असते. असं असलं तरी अनेक लोकांना 7-8 तास झोप होत असूनही सकाळी खूप थकवा जाणवतो. जसं की रात्री ते झोपलेच नाहीत. आज ही एक सामान्य समस्या बनली आहे. अनेक लोक त्यासोबत असं होत असल्याचं सांगतात. पण यामुळे आपल्या दैनंदिन कामावर नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत यामागील कारण आणि यावरचे उपाय समजून घेणे गरजेचे आहे.