PHOTO: जैन मुनींच्या अंत्यसंस्काराला का लावली जाते बोली? त्या पैशांचं नंतर काय केलं जातं?
Jain Saint Interesting Facts: जैन समाज आपल्या त्यागासाठी ओळखला जातो. इंद्रियांवर विजय प्राप्त करण्याचे साक्षात उदाहरण आहेत जैन मुनी. उन्ह असो वा पाऊस कशाचीही तमा न बाळगता आधुनिक समाजात हे मुनी अतिशय कठोर जीवन जगत असतात. मोह, माया यापासून दूर राहण्याचा संदेश जैन मुनी आपल्या जगण्यातून देत असतात.
जैन समाजाच्या नियमानुसार जैन मुनींचे अंत्य संस्कार केले जातात. अंत्य संस्काराच्या अगोदर महाराजांना डोलीमध्ये बसवून त्यांची अंत्ययात्रा काढली जाते. जैन समाजाच्या नियमांबाबत इतर धर्मातील लोकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. जैन मुनींच्या अंत्यसंस्काराला बोली लावली जाते. तसेच ते पैसे विशिष्ट गोष्टीसाठी वापरले जातात.